वसईत लहान मुलांच्या पोलिओ लसीसाठी वसई तालुका आरोग्य विभागाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 06:48 PM2021-06-26T18:48:26+5:302021-06-26T19:11:12+5:30

Vasai Polio Vaccine : वसईमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अनेक नागरिक कोरोना बाधित झाल्याचे दिसून आले. 

Vasai taluka health department appeals for polio vaccine for children in Vasai | वसईत लहान मुलांच्या पोलिओ लसीसाठी वसई तालुका आरोग्य विभागाचे आवाहन

वसईत लहान मुलांच्या पोलिओ लसीसाठी वसई तालुका आरोग्य विभागाचे आवाहन

googlenewsNext

वसई - रविवारी होणाऱ्या पोलिओ लसीकरणासाठी वसईतील आरोग्य विभाग सज्ज झाला असून लहान मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. वसईमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अनेक नागरिक कोरोना बाधित झाल्याचे दिसून आले. 

मात्र आता ही लाट काही प्रमाणात ओसरत असून तिसऱ्या लाटेची  शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच आता शासनातर्फे पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम देखील दि.27 जून रोजी रविवारी  राबविण्यात आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या पाच वर्षां पर्यंतच्या मुलांना पोलिओ लस देण्याचे आवाहन वसई तालूका आरोग्य विभागाने केले आहे. 

तसेच ज्या लहान मुलांना कोणत्याही प्रकारची लक्षणे असतील तर अशा मुलांची कोरोना चाचणी करण्यात यावी आणि ही चाचणी वसई ग्रामीण आरोग्य केंद्रात मोफत करण्यात येत असून त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन वसई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी केले आहे.

 

Web Title: Vasai taluka health department appeals for polio vaccine for children in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.