वसई विकास बँकेचे अध्यक्ष म्हात्रे डिफॉल्टर; मालमत्ता लिलावात, अध्यक्ष कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:15 AM2018-08-03T03:15:39+5:302018-08-03T03:15:48+5:30
वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना रु ६.७३ कोटी मुद्दल व दिड कोटीचे व्याज थकविल्या प्रकरणी बँक आॅफ बडोदाने डिफॉल्टर ठरविले असून त्यांच्या बंद पडलेले कंपनीच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव पुकारला आहे.
- सुनिल घरत
पारोळ : वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना रु ६.७३ कोटी मुद्दल व दिड कोटीचे व्याज थकविल्या प्रकरणी बँक आॅफ बडोदाने डिफॉल्टर ठरविले असून त्यांच्या बंद पडलेले कंपनीच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव पुकारला आहे. त्यामुळे ते या बँकेच्या अध्यक्षपदी कसे राहू शकतात? असा सवाल बँकेच्या काही भागधारकांनी उपस्थित केला आहे. याबाबत वसई विकास बँकेचे जागृत सभासद तथा पर्यावरण संरक्षण समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांनी बँक प्रशासनास जाब विचारला आहे.
राष्ट्रीयकृत बँकेने डिफॉल्टर ठरवलेली व फोटो छापून जनतेला जिच्याबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे अशी व्यक्ती एखाद्या सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कशी असू शकते. दीड हजार कोटी रु पयाहून अधिक ठेवी आणि अडीच हजार कोटी रुपयाचा व्यावसायिक टप्पा पार केलेल्या या बँकेच्या चाव्या डिफॉल्टरांच्या हाती तर पडल्या नाहीत ना? असा प्रश्न वसई विकास सहकारी बँकेच्या ग्राहक, ठेवीदार, सभासद व खातेदारांत विचारला जात आहे. वसई विकास बँकेची सर्वसाधारण सभा येत्या रविवारी रोजी होणार असून हा विषय प्रचंड गाजणार आहे. यावेळी म्हात्रे यांचा राजीनामा मागितल्या जाणार असल्याचे एका ज्येष्ठ संचालकाने सांगितले. सोमवंशी क्षत्रिय समाजाची म्हणून ओळखली जाणारी वसई विकास सहकारी बँक ही जिल्हृातील एक नामांकित शेड्यूल्ड बँक असून, तिच्या मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात एकवीस शाखा आहेत. या बँकेच्या निर्मिती आणि वाटचालीसाठी अनेक समाजधुरीणांनी आपले योगदान दिलेले आहे. मात्र बँक हल्ली मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी मनमानीने चालविण्यात येऊन तिची बदनामी केली जात असल्याने त्याबाबत सभासदांमध्ये नाराजी उमटत आहे. या बँकेचे अध्यक्ष हेमंत रमेश म्हात्रे व त्यांच्या पाच भागिदारांनी पालघर जवळील उंबरगाव (जि. बलसाड, गुजरात ) येथे मे.एस. क्यू. स्क्विझर्स प्रा.लि.या कंपनीसाठी बँक आॅफ बडौदा कडून २०१३ साली रु .९ कोटीचे व्यावसायीक कर्ज घेतले होते. मात्र चिकू पासून ज्यूस निर्मितीचा त्यांचा व्यवसाय बंद पडला.
बँकेचे परतफेडीचे हप्ते बंद केल्याने दि.२० मे २०१६ पासून त्यांचे खाते एन.पी.ए. झाले या कंपनीकडे कर्जापैकी रु. ६ कोटी ७३ लाख मुद्दल व सुमारे दिड कोटी रु पये व्याजाचे थकलेले असून कंपनीची रु . २ कोटी ७४ लाखाची जमीन व इमारत लिलावात काढण्यात आली आहे. बँकेतर्फे नोटिसा पाठवून, सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करु न हेमंत रमेश म्हात्रे यांच्यासह अतिश सावे, प्रीत पाटील, रविंद्र पाटील, गोविंद गावड, व आनंद राऊत या संचालकांना डिफॉल्टर घोषित केले असून, आणखी कुणा बँकेची फसवणूक नको म्हणून आम्ही त्यांच्या फोटोसह जाहिराती छापल्याचे बडौदा बँकेने सांगितले आहे.
भागधारक म्हणतात कारवाई करा!
वसई विकास सहकारी बँकेचे एक जागृत सभासद, समीर वर्तक यांनी या प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी आद्घधकारी दिलीप संत यांना निवेदन देऊन, बँक आॅफ बडौदा आणि रिझर्व्ह बँक यांनी कसुरदार ठरवलेले हेमंत म्हात्रे यांच्यावर नियमानुसार कारवाईची मागणी केली आहे?
बँक आॅफ बडौदातील थकबाकीचा हा विषय वृत्तपत्रात आला आहे? अध्यक्षाबाबत सभासदाकडून तक्र ार आली असली तरी त्यावरील निर्णय संचालक मंडळ घेईल. आमची बँक उत्तम व्यवसाय करीत असून, सतत प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे?
-दिलीप संत
मुख्य कार्यकारी आद्घधकारी,
वसई विकास सहकारी बँक