वसई-विरारमध्ये घरोघरी ३ हजार १८५ माघी बाप्पांचे होणार आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:36 AM2019-02-08T02:36:06+5:302019-02-08T02:36:40+5:30
आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाची धूम आता मराठी माघ महिन्यातही जल्लोषात साजरी होऊ लागली आहे.
पारोळ : आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाची धूम आता मराठी माघ महिन्यातही जल्लोषात साजरी होऊ लागली आहे. ठिकठिकाणी बाप्पांच्या उत्सवाचा जल्लोष वर्षातून दोनदा साजरा होत असल्याने बाहेरगावी कामाधंद्यासाठी स्थायिक झालेल्या नागरिकांची पावले आपसूकच आपल्या गावाकडे वळू लागतात. या आठवड्यात शुक्र वारी (दि.८) माघी गणेशोत्सव सुरू होत आहे. या तालुक्यात यंदा ३ हजार १८५ बाप्पांचे आगमन होणार असून यात ४३ सार्वजनिक तर ३ हजार १४२ घरगुती बाप्पा आहेत.
तालुक्यात बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून गणेश कला मंदिरांतदेखील बाप्पांच्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी, गुरु वारी गर्दी केली. वसई-विरार उपप्रदेशाची लाकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. बाहेरगावाहून कामाधंद्यानिमीत्त याठिकाणी स्थायिक झालेले नागरिक धार्मिक श्रद्धेपोटी आॅगस्ट आणि मराठी माघ महिन्यात बाप्पांची घरी आरास केलेल्या मखरात प्रतिष्ठापना करतात. यंदा शुक्रवारी बाप्पांचा उत्सव साजरा होत असून तालुक्यात सार्वजनिक मंडळांनी रात्रीचा दिवस करून मखरांची आरास करण्यास सुरूवात केली आहे. माघी गणेशोत्सवात सर्वाधिक नवस केलेल्या बाप्पांची संख्या अधिक आहे. बाप्पासमोर एखादा बोललेला नवस पूर्ण झाला की बाप्पांची ५ वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली जाते. तसेच बाप्पाला बोलल्याप्रमाणे नवस पूर्ण झाला की ५ वर्षांनंतर काही भाविक गणपती आणणे बंद करतात. असे असले तरीदेखील वसई-विरारमध्ये बाप्पांची संख्या वर्षागणिक वाढतच आहे.
मागील वर्षी वसई तालुक्यात ३ हजार १४५ बाप्पांचे आगमन झाले होते. त्यात ३५ सार्वजनिक तर ३ हजार ११० घरगुती बाप्पा होते. यंदा हे प्रमाण ७५ ने वाढले आहे. माघी गणेशोत्सव असला तरी काही भाविक दीड दिवसांसाठी, अडीच दिवसांसाठी किंवा पाच दिवसांसाठी बाप्पांची प्रतिष्ठापना करतात. सार्वजनिक मंडळांकडून या काळात भाविकांसाठी खास मनोरंजनपर कार्यक्र म, सांस्कृतिक कार्यक्र म आयोजित केले जातात.