वसई विरारमध्ये रस्त्यावर फिरतात ४५ हजार भटकी कुत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:05 AM2019-05-07T01:05:14+5:302019-05-07T01:05:34+5:30
वसई विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नवनवीन घोटाळे उघड झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर फिरणारे भटकी कुत्र्यांच्या नसबंदीचा नवीन घोटाळा झाला असल्याचे व नसबंदी कागदावर दाखवून दीड करोड रु पये मनपा अधिकार्यांनी लाटल्याचा आरोप केला जात आहे.
नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नवनवीन घोटाळे उघड झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर फिरणारे भटकी कुत्र्यांच्या नसबंदीचा नवीन घोटाळा झाला असल्याचे व नसबंदी कागदावर दाखवून दीड करोड रु पये मनपा अधिकार्यांनी लाटल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर फिरणारे 45 हजार भटकी कुत्रे मनपाच्या नसबंदी अभियानाची पोलखोल करत असून दररोज वाढणारी भटक्या कुत्र्यांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी विरारच्या लगतच वैतरणा येथे भटक्या कुत्र्यांनी लहान लहान सात मुलांवर हल्ला करून जखमी केले होते. याआधीही असे अनेक हल्ले भटक्या कुत्र्यांनी वसई विरार शहरामध्ये केल्याच्या घटना घडल्या आहे.
भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी बाबत वसई विरार शहर महानगरपालिका बजेटमध्ये लाखो रु पये खर्च केल्याचा उल्लेख दरवर्षी केला जातो. भटक्या कुत्र्यांच्या देखरेख आण िनसबंदीसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने 2015-2016 साली 13 लाख 78 हजार रु पये खर्च, 2016-2017 मध्ये 33 लाख 43 हजार रु पये खर्च, 2017-2018 या सालामध्ये 56 लाख 25 हजार रु पये खर्च तर 2018-2019 साली 60 लाख रु पये खर्च असा एकूण मागील 4 वर्षांमध्ये 1 करोड 63 लाख 46 हजार रु पये खर्च केला आहे.
इतक्या मोठ्या खर्चावर स्थानिक रहिवाश्यांनी सांगितले की, जर मनपा खरोखरच भटक्या कुत्र्यांवर खर्च करण्याचा दावा करत असेल तर विविध परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यामुळे सामान्य नागरिक
परेशान आहे. भटक्या कुत्र्यांची
संख्या दिवसेंदिवस वाढत
आहे.
वसई विरार मनपाच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार होत असून घोटाळे उघड होत आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी कागदावरच असून त्यासाठी आलेला खर्च अधिकार्यांनी फक्त कागदापुरताच मर्यादित ठेवला आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे.
- राजकुमार चोरघे (आरोपकर्ते)
याबाबत कोणतीही तक्र ार मी पाहिलेली नसून माङयापर्यंत आलेली पण नाही. जर तक्र ार आली तर मी नक्कीच बघेन.
- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार महानगरपालिका)