वसई विरार शहराची 4 हजार रूग्ण संख्येकडे वाटचाल;10 कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 09:49 PM2020-06-29T21:49:34+5:302020-06-29T21:50:03+5:30

रेकॉर्ड ब्रेक 367  रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले

Vasai Virar city on its way to 4000 patients; 10 corona patients died | वसई विरार शहराची 4 हजार रूग्ण संख्येकडे वाटचाल;10 कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

वसई विरार शहराची 4 हजार रूग्ण संख्येकडे वाटचाल;10 कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

Next

-आशिष राणे

वसई -विरार शहरात सोमवारी सर्वाधिक रेकोर्ड ब्रेक 367 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले तर पालिका हद्दीतील 10 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून  शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 3 हजार 917 वर पोहचली आहे.

तर दिवसभरात 116 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे दरम्यान सोमवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 367 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई-87  नायगाव - 8 वसई-विरार- 9 नालासोपारा- 147  आणि विरार-116   यात  पुरुष 192 व 175 महिला रुग्ण अशा एकूण 367 रुग्णाचा अंतर्भाव आहे.

तर धक्कादायक ; पालिका हद्दीत सोमवारी 10  रुग्णाचा मृत्यू 

पालिका हद्दीत सोमवारी एकदम 10 रुग्णाचा मृत्यू झाल्यानं शहराची चिंता अधिक वाढली आहे.  यात वसई -3,नालासोपारा-2,विरार -4 आणि नायगाव -1 असे मयत रूग्ण आहेत. त्यामुळे आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 115  इतकी झाली आहे . तर आतापर्यंत शहरात विविध रुग्णालयात एकूण 1982 रुग्ण कोरोना वर उपचार घेत आहेत.

शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित मयत व बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने  ही बाब पालिकेच्या दृष्टीने महाचिंतेची बनून राहिली आहे.

दिलासादायक ; वसई विरार शहरात 116  रूग्ण घरी परतले 

वसई विरार मनपा हद्दीत सोमवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 116 रूग्ण आपापल्या घरी परतले. यात वसई- 24 वसई- विरार- 3 नायगाव- 2    नालासोपारा-  48 आणि विरार - 39 असे एकूण 116 मुक्त रूग्ण आहेत, त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 1820  वर पोहचली आहे.

Web Title: Vasai Virar city on its way to 4000 patients; 10 corona patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.