वसई विरार मनपा आता मोबाईलवर

By admin | Published: August 19, 2016 02:01 AM2016-08-19T02:01:23+5:302016-08-19T02:01:23+5:30

वसई विरारच्या नागरिकांना आता पालिकेसंदर्भातील कुठलीही माहिती हवी असेल किंवा कुठलीही तक्रार करायची असेल तर ती एका क्लिकवर करता येणार आहे. त्यासाठी पालिकने

Vasai Virar Manpa now on mobile | वसई विरार मनपा आता मोबाईलवर

वसई विरार मनपा आता मोबाईलवर

Next

वसई : वसई विरारच्या नागरिकांना आता पालिकेसंदर्भातील कुठलीही माहिती हवी असेल किंवा कुठलीही तक्रार करायची असेल तर ती एका क्लिकवर करता येणार आहे. त्यासाठी पालिकने ‘व्ही अ‍ॅप’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले असून स्वातंत्र्यदिनी त्याचा शुभारंभ झाला आहे.
महापालिकने संकेतस्थळ सुरू केलेले होते. परंतु नागरिकांच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पालिकेने आता मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन पालिकेचे स्वतंत्र अ‍ॅप्लिकेशन असून सोमवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्याचा शुभारंभ करण्यात आला. मोबाईल प्ले स्टोर मधून कुठल्याही अ‍ॅण्ड्रॉईड फोनध्ये ते विनमूल्य डाऊनलोड करता येणार आहे.
हे अ‍ॅप नागरिकांना अनेक प्रकारे उपयोगी पडणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागाची माहिती या अ‍ॅपवर आहे. पालिकेचे विविध विभाग, विविध योजना, अधिकारी नगरसेवकांचे क्रमांक, आपतकालीन यंत्रणेचे क्रमांक, शहराची माहिती त्यात आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुचना आणि तक्रारीही या अ‍ॅपद्वारे करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय मालमत्ता कर आणि पाणीपट्टीही नागरिकांना या अ‍ॅपद्वारे भरता येणार आहे. यमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे तसेच त्यांना पालिकेबरोबर व्यवहार करणे अत्यंत सोपे आणि सोयीचे होणार आहे.
पालिका विविध सूचना आणि आवाहन करत असते. पालिकेने सुचना किंवा माहिती दिली तर अ‍ॅपवर नोटिफिकेशन येईल आणि नागरिकांना त्याची माहिती होणार आहे. गुगल प्ले मधून हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आपली प्राथमिक माहिती भरून नोंदणी करावी लागणार आहे.

Web Title: Vasai Virar Manpa now on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.