गोरगरिबांना वेठीस धरणाऱ्या शहर अभियान व्यवस्थापिका विभा जाधव अखेर कार्यमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:08 PM2021-10-01T12:08:57+5:302021-10-01T12:12:14+5:30
सर्वासामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या प्रशासनातील मुजोर अधिकाऱ्यांवर दणकेबाज कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती भाजपाच्या अशोक शेळके यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
वसई - पालिकेतील मुजोर कनिष्ठ अभियंते, वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी तसेच इतर अधिकारी, असे कारवाईचे सत्र सुरू असतानाच पुन्हा एकदा आयुक्तांनी कंत्राटी अधिकारी वर्गाला मोठा दणका दिला आहे. वारंवार बदलीचे आदेश होऊनही एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या शहर अभियानाच्या व्यवस्थापिका विभा तानाजी जाधव यांना अखेरीस पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश आयुक्त गंगाथरन डी यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त यांनी दि 30 सप्टेंबर 2021रोजी गुरुवारी दिले.
सर्वासामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या प्रशासनातील मुजोर अधिकाऱ्यांवर दणकेबाज कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती भाजपाच्या अशोक शेळके यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे
यासंदर्भात शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभा तानाजी जाधव या कंत्राटी पद्धतीने सेवेत रुजू झाल्या होत्या. शहर अभियान व्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. या पदावर काम करीत असताना त्यांच्या एकुणच कार्यपद्धतीबाबत अनेक शंका, तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या.
तर कामातील बेजबाबदार पणा गैरवर्तणूक, मुजोरपणा आणि लाखो रुपयांच्या अपव्यवहाराबद्दल त्यांच्यावर यापूर्वी अनेक आरोप केले गेले होते. त्यानुसार श्रीमती विभा जाधव यांची यापूर्वी ३ वेळा बदली झाली असतानादेखील बदली आदेश झुगारून त्या त्यांच्या पदावर ठाण मांडूनच बसल्या होत्या.
दरम्यान अशा या बेजबाबदार मुजोर अधिकाऱ्याला बदलीच्या ठिकाणी पाठवण्याचे आदेश देऊन त्यांच्यावरील असलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेशाचे युवा सह संयोजक यांनी संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालाय, मुंबई यांच्याकडे केली होती. अशोक शेळके यांच्या मागणीच्या तत्परतेने याची गंभीर दखल घेऊन पालिका प्रशासनाने विभा जाधव यांना दि. ३० सप्टेंबर २०२१ पासून सेवेतून कार्यमुक्त केले आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा पालिका सेवेतील कायमस्वरूपी व कंत्राटी पद्धतीवर ठाण मांडून बसलेल्याना हा एक दणकाच आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे