वसई-विरार महापालिका शहरात सर्वाधिक 18 रुग्ण वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 07:56 PM2020-05-11T19:56:51+5:302020-05-11T19:57:02+5:30
संख्या पोहचली 224 वर ; तर दिलासादायक बाब... मुक्त झाले 20 जण !
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी वसई -विरार व नालासोपारा भागात पुन्हा सर्वाधिक असे 18 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याने शहर चिंतातुर झाले आहे.
तर धक्कादायक म्हणजे विरार भागात राहणारी १ वर्षीय मुलगी आणि नालासोपाऱ्यातील 8 वर्षाच्या मुलाचा समावेश देखील झाला असून सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कमी वय असलेले कोरोना बाधित रुग्ण यांची संख्या बऱ्यापैकी आहे.
तर दिलासा देणारी बाब पहिली असता सोमवारी पालिका हद्दीतील रुग्णालयातून मोठ्या संख्येने 20 कोरोना रुग्ण मुक्त झाले असल्याची माहिती पालिकेने दिली,
त्यामुळे आता सोमवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 224 वर पोहचली आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये 10 पुरुष आणि 8 महिलां-मुली चा समावेश आहे,
यात वसईतील 20 वर्षीय व 57 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे,तर नालासोपाऱ्यातील 5 महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.तर विरार मधील 3 महिला आणि 4 पुरुष देखील आहेत.
कमी वयाचे रुग्ण हि चिंतेची बाब !
गंभीर म्हणजे नालासोपाऱ्यातील महिला रुग्णात 14, 22 व 27 वर्षीय मुली-महिलाचा समावेश आहे तर 8 वर्षाचा मुलगा देखील आहे.तसेच विरार मधून 1 आणि 17 वर्षांची मुलगी असून 18 वर्षाचा मुलगा देखील कोरोना बाधित आढळून आला आहे.
एकूणच या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 224 वर पोहचली असून यात पालिका हद्दीत 9 जण मयत झाले आहेत.
तर सोमवारी पालिका हद्दीत 20 जण मुक्त झाल्याने आता एकूण संख्या ही 125 वर गेली आहे. तर आजवर 90 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत
दि.11 मे 2020 सोमवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारी
वसई -2 पुरुष,
नालासोपारा -5 महिला ,4 पुरुष
विरार -3 महिला 4 पुरुष
आणि विरार 2 पुरुष
एकूण रुग्ण संख्या -18
वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -224
कोरोना मुक्त संख्या :- 125
कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 9
उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-90