वसई-विरार महापालिकेची तोडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:56 PM2019-02-01T22:56:26+5:302019-02-01T22:56:43+5:30
पालिका प्रशासनाने औद्योगिक गाळे, बॅनर, पोस्टर आणि अनिधकृत इमारतीवर पोकलेंनच्या सहायाने कारवाई केली आहे.
नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागात पालिकेचे उपायुक्त डॉ. किशोर गवस यांच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसापासून अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाईची सुरू आहे. पालिका प्रशासनाने औद्योगिक गाळे, बॅनर, पोस्टर आणि अनिधकृत इमारतीवर पोकलेंनच्या सहायाने कारवाई केली आहे.
प्रभाग ‘ब’चे सहायक आयुक्त विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरु वारी पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील सहा हजार चौरस फूट लांबीचे अनधिकृत मार्केट तोडण्यात आले आहे. तसेच, आजूबाजूच्या रस्त्यालगत असलेले बॅनर आणि पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच दिवशी प्रभाग ‘एफ’ मध्ये गावराई पाडा येथील आदर्श औद्योगिक विभागातील १८०० चौरस फूट आणि वधन नगरमधील २४०० व १३५० चौरस फूट लांबीचे दोन गाळे ही उध्वस्त करण्यात आले. शुक्र वारी प्रभाग ‘सी’मध्ये गांधी चौकातील फुलपाडा येथील २ मजल्याची अतनधिकृत इमारत आणि ५ रूम तोडण्यात आले. तसेच बरफपाडा येथील सर्व्हे नंबर ४५ मधील अनधिकृतपणे बनविण्यात आलेली प्लिन्थ तोडण्यात आली. स्थानिकांनी पालिकेच्य पथकाला किरकोळ विरोध केला मात्र, पोलीस दल सोबत असल्याने तो निवळला. मात्र, ही बांधकामे सुरु असताना मनपाकडून कोणतीही कारवाई न झालल्याने आज सर्वसामान्या उघड्यावर आल्याची प्रतिक्रीय देण्यात आली.