वसई विरार महापालिकेच्या दिरंगाईने जोसडी वंचितच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:57 AM2019-02-05T02:57:35+5:302019-02-05T02:58:25+5:30
वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे.
वसई - वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे. महापालिकेकडे अनेकदा तक्र ारी करून सुद्धा फक्त आश्वासने मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
भुईगाव इथे असलेले जोसोडी हे गाव अनेक सुविधांपासून वंचित आहे. महानगरपालिकेची दिरंगाई हि सामन्य नागरिकांना नेहमीच हैराण करीत असते. वसई विरार मधल्या गावांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांनी अनेकदा मागण्या करून देखील पालिके कडून टाळाटाळ होत आहे. पालिकेने काही मागण्या मान्य करून कामे केली आहेत तरी ती अगदीच हलक्या दर्जाची आहेत. तर या गावातील नागरिकांना पाणी, रास्ता, इ. गोष्टींसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागत आहेत.
दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या नाल्यामुळे वाहनांना तेथून ये-जा करणे कठीण होत होते, यासाठी नागरिकांनी पालिकेकडे नाल्यावर स्लॅबची मागणी केली होती. पालिकेने अनेक मागण्यां नंतर गेल्या वर्षी मे महिन्यात हा स्लॅब बांधला पण लगेचच दोन मिहन्यात तो खचला. त्यावरून आता अवजड वाहनांना जाता येत नाहीत आणि जरी गेली तर स्लॅब तुटून खाली पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
(पान ३ वर)
स्लॅब खचला, गटारे अरुंद, पाणीटंचाई ओढावली, पावसाचे पाणी राहते तुंबून, शेतीला धोका, कचरा साठतो
स्लॅब खाचल्यामुळे त्यावरून अवजड वाहने जाऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेची कचरा उचलणारी गाडी देखील येत नाही त्यामुळे लोकांना बाहेर जावे लागते.
बंधारा नसल्याने पाणी जाऊन शेती खराब होते. धारणाकडचा रस्ता खराब असल्यामुळे पाय घसरून नागरिक खोल पाण्यात पडू शकतात.
पाण्याची मोटर चालू करण्यासाठी लोकांना चिखलातून जावे लागते. रास्ता एकदमच खराब आहे.
रस्त्याला भेगा पडल्यामुळे सरपटणारे प्राणी त्यात लपून राहतात व गाड्या त्यात अडकतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तर प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण होतो.
गटारे अरु ंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही, पावसाळ्यात पाणी भरते. ये जा करायला नागरिकांना त्रास होतो.
धरणातले पाणी आटल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
कंत्राटदारांनी पाईप कापल्यामुळे गटारात उतरून पाणी घ्यावे लागते.
मध्यंतरी काम सुरु करण्यात आले होते पण गावकर्यांनी आम्हांला अडवलं. गावकरी काम करू देत नाही.
- अमिता तापडे, नगरसेविका
प्रोसिजर प्रमाणे काम होणार. ही कामं महासभेत मांडलेली आहे त्यामुळे त्यांचे टेंडर निघायला व इतर प्रोसिजरला वेळ लागतो.
-प्रभाग समिती सभापती, प्राची कोलासो
लहान मुलांपासून जेष्ठ नागरीकां पर्यंत सगळ्यांना त्रास होत आहे. पत्र व्यवहार झालेला आहे. एकिह सुविधा पूर्णत: नाही.
-स्थानिक रहिवासी- विलियम डाबरे