वसई-विरार महापालिका : अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:23 AM2018-06-15T04:23:59+5:302018-06-15T04:23:59+5:30

वसई विरार शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण व कारवाई करण्यात अपयशी ठरलेली व पालिका आयुक्तांनी स्वत: स्थापन केलेली महानगरपालिकेची अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती गुरुवारी बरखास्त केल्याची माहिती पालिका आस्थापना विभागाचे प्रमुख रवी पाटील यांनी लोकमतला दिली आहे.

Vasai-Virar Municipal Corporation: Dismissal of Unauthorized Construction Control Committee | वसई-विरार महापालिका : अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती बरखास्त

वसई-विरार महापालिका : अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती बरखास्त

Next

वसई  - वसई विरार शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण व कारवाई करण्यात अपयशी ठरलेली व पालिका आयुक्तांनी स्वत: स्थापन केलेली महानगरपालिकेची अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती गुरुवारी बरखास्त केल्याची माहिती पालिका आस्थापना विभागाचे प्रमुख रवी पाटील यांनी लोकमतला दिली आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वीच दस्तुरखुद्द पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली पालिकेतील विविध विभाग व त्यांचे उपायुक्त, सहा.आयुक्त व इतर अधिकारी मिळून अशी एक महत्वाची समिती स्थापन केली होती, तिने प्रत्येक प्रभागातील अनधिकृत बांधकामावर अंकुश म्हणून अतिक्र मण विभाग व सहा. आयुक्तांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेऊन बेकायदा बांधकाम धारकाला वेळीच नोटीस बजावणे, गुन्हे दाखल करणे अथवा न्यायालयीन कारवाई करणे तसेच प्रसंगी निष्कासनाची कारवाई करणे आदी जबाबदाऱ्या नेमून दिल्या होत्या, मात्र तरीही शहरात अवैध बांधकामे वाढत होती. या समितीतील काही निवडक सदस्यांवर गुन्हे ,भ्रष्ट कारभाराचे आरोप तर काहिंवर निलंबनाची कारवाई झाली,
अखेर उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिकेच्या एका बैठकीत ही समितीच बरखास्त करून यात तिच्याकडील जबाबदाºया या त्या -त्या प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे देण्याबाबत गुरूवारी निर्णय घेतला.
समिती अपयशी का ठरली याचा शोध घेऊन त्या त्रुटी व उणिवा दूर करण्याची व तिचे अस्तित्व टिकवून तिला प्रभावी करण्याची गरज असतांना तिला बरखास्त का केली असा प्रश्न चर्चिला जात आहे. परंतु त्याबाबत आयुक्तांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

प्रशासनात होती नाराजी

आपले अधिकार काढून घेऊन ते या समितीकडे दिले गेलेत अशी भावना महापालिका प्रशासनातील अधिकाºयांची झाली होती. त्यामुळे त्यांची असलेली नाराजी भोवल्यामुळे ही समिती हेतूत: अपयशी ठरविली गेली असावी अशीही चर्चा सुरू आहे.

Web Title: Vasai-Virar Municipal Corporation: Dismissal of Unauthorized Construction Control Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.