महिला आरक्षणाचा दिग्गजांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:48 PM2020-02-28T23:48:36+5:302020-02-28T23:49:37+5:30

सोडत जाहीर; वसई-विरार महापालिका निवडणूक

vasai virar municipal corporation election Women Reservation affects many veterans | महिला आरक्षणाचा दिग्गजांना बसला फटका

महिला आरक्षणाचा दिग्गजांना बसला फटका

Next

वसई/विरार : बहुचर्चित वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रस्थापित सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवक, सभापती ते आजी-माजी उपमहापौर, महापौर अशा अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आजी-माजी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांसह अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना पर्यायी प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे.

मागील महिनाभरापासून या आरक्षण सोडतीकडे सत्ताधारी बविआपासून सर्वच राजकीय पक्षांचे व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. यात बहु-सदस्यीय पद्धत रद्द झाल्यामुळे यापूर्वीची सोडत रद्द करावी लागली होती. अखेर २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विरारच्या वर्तक सभागृहात जिल्हाधिकारी व आयुक्त डॉ. कैलास शिंदे व निवडणूक आयोगातर्फे पिठासीन अधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

यापूर्वीच्या आरक्षणाच्या आधारावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), पुरुष व महिला प्रभाग कोणते याचे आरक्षण काढण्यात आले. यात सर्व ११५ प्रभागांचे आरक्षण संगणकीय प्रणालीवर जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर होणार असल्यामुळे वर्तक सभागृहामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. कोणता प्रभाग आरक्षित होणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, विद्यमान महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. बहुतांश पुरुष नगरसेवक असलेले प्रभाग या वेळी महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथील दिग्गजांना फटका बसला आहे. नवघर-माणिकपूर शहरातील १० नगरसेवकांमध्ये विद्यमान नगरसेवक, सभापती व उपमहापौर असलेले प्रकाश रॉड्रिक्स, उमा पाटील, कल्पेश मानकर, सचिन घरत, फ्रँक डिसोझा यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर, किरण चेंदवणकर, मनीषा जाधव, वर्षा पाटील यांचे वॉर्ड सर्वसाधारण झाले आहेत. यामुळे आता विद्यमान महापौर व उपमहापौर या दोघांनाही नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे.

आरक्षित जागांची वॉर्डनिहाय माहिती
खुला वर्ग- एकूण- ७४ प्रभाग
१, १९, २८, ३७, ४६, ६४, ७३, ८२, ९१, १०९, २, २०, ३८, ४७, ५६, ९२, १०१, ३, २१, ३९, ५७, ६६, ८४, ९३, १११, ४, १३, २२, ४९, ५८, ६७, ७६, ८५, ९४, १०३, १४, ३२, ५०, ५९, ६८, ७७, ९५, १०४, ६, ३३, ६०, ६९, ७८, ८७, ९६, ११४, १६, २५, ४३, ५२, ६१, ९७, १०६, १७, ३५, ४४, ६२, ७१, ८०, ८९, ९८, ९, १८, २७, ३६, ४५, ५४, ७२ आणि ८१.

एसटी- एकूण : ५
७४, ७५, ८८, १०७ आणि ९०
एससी-एकूण : ५
२३, ११२, ४२, ७ आणि ७९
ओबीसी- एकूण- ३१
१०, ११, १२, ५५, १००, २९, ६५, ८३, ११०, ३०, ४८, १०२, ३१, ४०, ५, ४१, ८६, ११३, १५, २४, ५१, १०५, ३४, ७०, ११५, ८, २६, ५३, ६३, ९९ आणि १०८.

यांच्या आशा पल्लवित : माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, सत्ताधारी बविआचे भरत गुप्ता, संदेश जाधव, विवेक पाटील, तसेच मागील वेळी प्रभाग आरक्षित झाल्याने शांत राहिलेली मंडळी आणि इच्छुक युवा अथवा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, मनसे आदी पक्षातील मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: vasai virar municipal corporation election Women Reservation affects many veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.