"प्रवासी वर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध, बुम सेवा देणारी वसई-विरार महापालिका देशात पहिलीच"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:17 PM2021-01-05T19:17:24+5:302021-01-05T19:35:27+5:30

Vasai-Virar Municipal Corporation : वसई - विरार महापालिका परिवहन सेवेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला

Vasai-Virar Municipal Corporation is the first in the country to provide a boom service | "प्रवासी वर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध, बुम सेवा देणारी वसई-विरार महापालिका देशात पहिलीच"

"प्रवासी वर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध, बुम सेवा देणारी वसई-विरार महापालिका देशात पहिलीच"

googlenewsNext

वसई - विरार भाग व इतरही प्रवासी वर्गास उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याकरिता पालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगत बुम सेवा देणारी कदाचित वसई विरार महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचे सांगत खऱ्याअर्थी आजच्या दिवशी महापालिकेच्या वतीनं अधिकृतपणे लोकार्पण झाले असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत केले. आम्ही स्वच्छ सूर्यप्रकाशांत विकासकामांची उद्घाटन करतो तर विरोधक हे रात्रीच्या अंधारात उद्घाटन करतात असा टोला ही एकनाथ शिंदे यांनी सत्ताधारी बविआला लगावला

परिवहन सेवा नागरिकांसाठी आहे यात आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण आणत नाही. खरं तर यामध्ये सर्वांनी सहभागी होणे गरजेचे होते. मात्र ठीक आहे बुम पद्धतीने सुरू झालेल्या या परिवहन सेवेचा आर्थिक भार पालिकेवर अजिबात राहणार नाही तर अजून 150 बसेस येतील व जेष्ठ नागरिक, दिवांग्य, विद्यार्थी आदींना सवलत आहेच. मात्र वसई विरार पालिका व त्याच्या परिवहन  विभागातर्फे यापुढेही नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे ही शिंदे यांनी कार्यक्रमावेळी स्पष्ट केले.

वसई - विरार महापालिका परिवहन सेवेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि नगरविकास मंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर अखेर शहरात बसेस धावू लागल्या. या प्रसंगी पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, पालिका आयुक्त गंगाथरन डी, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, आमदार श्रीनिवास वनगा, तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Vasai-Virar Municipal Corporation is the first in the country to provide a boom service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.