वसई - विरार महापालिकेस मिळाले "कोविशिल्ड" लसीचे 7 हजार डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 08:35 PM2021-01-14T20:35:48+5:302021-01-14T20:37:17+5:30
Corona Vaccine : केंद्र सरकारच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची तयारी केलेली आहेच मात्र महापालिका प्रशासन लसीकरणासाठी सज्ज देखील असल्याचे यापूर्वी च आयुक्तांनी स्पष्ट केले होते.
-आशिष राणे
वसई - केंद्र सरकारच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची तयारी केलेली आहेच मात्र महापालिका प्रशासन लसीकरणासाठी सज्ज देखील असल्याचे यापूर्वी च आयुक्तांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार अखेर पालघर जिल्ह्यात सर्वप्रथम कवी शिल्ड लसीचे आगमन झाले आणि त्वरित संक्रातीच्या मुहूर्तावर गुरुवार दि.14 जानेवारी 2021 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, यांचे मार्फत वसई विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी कोविशिल्ड (COVISHIELD ) या लसीचे एकूण 7 हजार डोस वसई-विरार शहर महानगरपालिकेस उपलब्ध झाल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत संध्याकाळी उशिरा दिली.
या लसी बाबतीत बोलताना जनसंपर्क अधिकारी पाटील यांनी सांगितले की, जिल्हा आरोग्य विभाग पालघर यांनी उपलब्ध करून सुपूर्द केलेल्या या लस महापालिकेच्या वरुण इंडस्ट्रीज, वालीव आणि वसई पूर्व या लसीकरण केंद्रात शीतगृहात ( cold- storej) मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
शनिवारी "कोविशिल्ड"लसीचा श्रीगणेशा; सर्वप्रथम लस आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार !
आनंदाची बाब म्हणजे राज्यसरकारने घोषित केल्यानुसार येत्या शनिवार दि.16 जानेवारी 2021 रोजी को-विन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथमतः ही लस दिली जाणार आहे. या लसीकरणासाठी महानगरपालिकेने एकूण 10 लसीकरण केंद्र तयार केली असून एका केंद्रावर 100 लाभार्थी असे 10 केंद्रावर एका दिवसाला एक हजार लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे.
तर सदरची लस ही अत्यंत सुरक्षित असून अपवादात्मक स्थितीत लसीकरणानंतर जर काही दुष्परिणाम झाल्यास पुढील उपचाराकरिता (AEFI) कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे याउलट एईइफआय मॅनेजमेंट सेंटर (AEFI ) ही निश्चीत करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती महापालिका प्रशासनाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.