वसई-विरार महापालिकेचे उद्दिष्ट ३०० कोटींच्या करवसुलीचे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:33 AM2018-12-05T01:33:45+5:302018-12-05T01:33:52+5:30

वसई- विरार महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात एकूण २३ कोटी ५६ लाख इतकी करवसुली केली.

Vasai-Virar Municipal Corporation's tax target of 300 crores | वसई-विरार महापालिकेचे उद्दिष्ट ३०० कोटींच्या करवसुलीचे

वसई-विरार महापालिकेचे उद्दिष्ट ३०० कोटींच्या करवसुलीचे

Next

वसई : वसई- विरार महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात एकूण २३ कोटी ५६ लाख इतकी कर वसूली केली असून आतापर्यंत मालमत्ता कराची १०० कोटीची वसूली करण्यात आली आहे. तसेच ३०० कोटी रु पयांचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विविध प्रकारे थकबाकीदारांना आवाहन करण्यात येत आहे.
करवसूली करतानाच मालमत्ता जप्ती यासह नळजोडणी खंडित करण्याचा इशारा देखील प्रशासनाच्या मालमत्ता कर विभागाने दिला आहे. तिने चालू व थकबाकी करवसुलीवर भर दिला आहे, यासाठी रिक्षाचा वापर , विविध ठिकाणी मालमत्ता कर भरण्याविषयीचे फलक, देयके अदा करण्याची घोषणा करीत आहेत. करवसुलीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कराची वसुली व्हावी म्हणून ठेका पद्धतीने ११० कर्मचारी घेण्यात आले आहेत. वालीव, वसई, नालासोपारा, विरार, आचोळे, चंदनसार, नवघर- माणिकपूर, पेल्हार, बोळींज या नऊ प्रभागात मोहीम राबविली जात आहे. रहिवासी आणि औदयोगिक वसाहतीत हे कर्मचारी जात असून कर भरण्याचे आवाहन, देयके, नोटीस देण्याचे काम तसेच, वसूली करीत आहेत. मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांची यादी काढून त्यांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. शंभर टक्के मालमत्ताधारकांना देयके अदा करण्यात आली आहेत.
अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे हे रोज नऊ प्रभागातील सहाय्यक आयुक्तांकडून वसुलीचा अहवाल घेत आहेत. सर्व प्रभागात पर्यवेक्षक नेमलेले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत नागरीकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा केला नाही तर अशा मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असून प्रसंगी नळजोडणी बंद करण्यात येणार असल्याचा इशारा दिला जात आहे.
ठिकठिकाणी ज्या मालमत्ता धारकांची थकबाकी जास्त आहे त्यांच्या नावानिशी फलक लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर वसई विरार महापालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांनो होशियार, मालमत्ता कर लवकर भरा अन्यथा जप्ती आणली जाईल हो... अशी दवंडी मराठी व हिंदी भाषेतून केली जात आहे. गेल्यावर्षी अशीच दवंडी घोड्यावर बसून केली गेली होती. मागणीची देयके शंभर टक्के दिली असली तरी पुन्हा स्मरणपत्र देखील देण्यात येणार आहे.वसुलीवर भर दिल्याने नोव्हेंबर महिन्यात २३ कोटी ८६ लाख वसुली झाली आहे.
।यंदा मार्चपर्यंत ३०० कोटी वसुलीवर भर दिला आहे. यासाठी कर्मचारी घरोघरी, औदयोगिक वसाहत व व्यापाऱ्यांना देयके देणे व वसुली करणे असे काम करत आहेत. कार्यलयात येणे शक्य नसेल तर आॅनलाईन करभरणा करावा. थकबाकीदारांची वसुली करण्यासाठी नळजोडणी व मालमत्तेची जप्ती आणली जाईल. करदात्यांनी सहकार्य करावे.
- विश्वनाथ तळेकर, सहाय्यक आयुक्त, मालमत्ता कर संकलन विभाग

Web Title: Vasai-Virar Municipal Corporation's tax target of 300 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.