वसई विरार महापालिका दुर्घटनेच्या प्रतिक्षेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:14 PM2019-06-13T23:14:15+5:302019-06-13T23:14:34+5:30

नुसत्या नोटीसांनी काय होणार? : रहिवाशांना पर्याय नाही, पुन्हा घर मिळण्याची हमी नाही

Vasai Virar municipality awaiting accident? | वसई विरार महापालिका दुर्घटनेच्या प्रतिक्षेत?

वसई विरार महापालिका दुर्घटनेच्या प्रतिक्षेत?

googlenewsNext

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामध्ये शेकडो परिवार आपला जीव धोक्यात घालून राहतात. जोरदार पाऊस पडला तर अशा धोकादायक इमारतीना मोठ्या प्रमाणात धोका असतो. यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये याकरिता या धोकादायक इमारतींना महानगरपालिका नोटीस पाठवून देते आणि आपला पल्ला झाडते.

या इमारती रिकाम्या करुन त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी का पावले उचलत नाही? काही इमारती खाली करण्याबाबत कोर्टात केस चालू आहे. यामुळे या इमारती तोडून रिडेव्हलपमेंट करण्यासाठी कोणीही बिल्डर पुढे येत नाही. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. काही इमारती तर कधीही पडून मोठा अपघात घडू शकतो. इमारती खाली न करता काही परिवार याच इमारतीमध्ये आपला जीव मुठित ठेवून राहतात. भरपूर वेळा धोकादायक इमारती म्हणून मनपाने नोटीस पाठवून सुध्दाही रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत आणि महानगरपालिका या गंभीर विषयावर मूग गिळून बसली आहे. वसई विरार महानगरपालिकाने गेल्या पावसाळ्यापूर्वी या धोकादायक इमारतीना नोटीस पाठवून रिकाम्या करण्याचे आदेश द्या असे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले होते. या विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील धोकादायक इमारतीना नोटीस पाठवल्या तरी रहिवासी त्या रिकाम्या करतच नाहीत.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही घर रिकामे करू पण उद्या आम्हाला घर ते पुुन्हा मिळेल याची हमी काय? याबाबत वसई विरार महानगरपालिका काही ठोस पावले उचलत नसल्यामुळे आम्ही आमचा जीव मुठित ठेवून राहत आहोत. नालासोपारा पूर्वेकडील सर्वात जास्त धोकादायक अशा २३ इमारती आत्मवल्लभ सोसायटीमधे आहेत.
या इतक्या धोकादायक आहेत की काही घरे आरपार दिसत असून त्यांचे प्लास्टर मोठ्या प्रमाणात निघाले असल्यामुळे कधीही मोठी जीवितहानीची घटना घडू शकते. यांना नालासोपारा महानगरपालिका विभागाने धोकादायक इमारती म्हणून नोटीस पाठवल्या आहेत पण रहिवासी आपली घर रिकामी करीतच नाहीत.

आमची पर्यायी व्यवस्था का नाही करत असे नाव न सांगण्याच्या अटीवर आम्ही या धोकादायक इमारतीमधे राहत असून अनेक परिवार राहतात. आम्हाला राहण्याची पर्यायी व्यवस्था, भाडे, डिपॉझिट आणि आम्हाला पुन्हा घर मिळेल की नाही याचे काहीही ट्रस्टी सांगत नाही म्हणून आम्ही आमचा जीव मुठित धरत राहत आहोत.
- संतप्त रहिवाशी

Web Title: Vasai Virar municipality awaiting accident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.