वसई-विरार महापालिका डेंग्यू, हिवतापाने जेरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 06:11 AM2018-10-05T06:11:16+5:302018-10-05T06:11:31+5:30
यंत्रणा ठरल्या कुचकामी : आजार वाढत असताना प्रशासन म्हणते २१ रुग्ण
नालासोपारा : सप्टेंबर संपून आॅक्टोबर सुरू होताच वसई विरारमध्ये साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जुलै महिन्यातील वसईतील पुरानंतर शहराची आरोग्य व्यवस्था बिघडली असून डेंग्यूची साथ असताना आता त्याता हिवतापाची भर पडली आहे. शहरातील अनेक खाजगी रु ग्णालयात डेंग्यू आणि हिवतापाचे रु ग्ण उपचार घेत आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून पालिकेची यंत्रणा साथीचे आजार रोखण्यास अपयशी ठरली आहे.
शहरातील अनेक नागरिकांना डेंग्यू व मलेरियाची लागण झाल्याचे चित्र आहे. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे. डेंग्यू व मलेरिया यासारखे आजार होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता, जनजागृती, औषध फवारणी केले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु या साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वसईने डेंग्यू रोगाने धुमाकूळ घातला होता. पालिकेने मात्र डेंग्यूची संख्या कमी असल्याचा दावा करत डेंग्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले होते. मात्र आता डेंग्यू पुन्हा शहरात दाखल झाला आहे. एव्हरशाईन परिसरात पुन्हा डेंग्यूचे रु ग्ण आढळले आहेत.
याआधी विरार मधील एम जी एम नगर येथे खोदण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात डेंग्यूचे मच्छर आढळले होते. मात्र यावर पालिकेने उपाययोजना न केल्याने आता या रोगांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अनेक रु ग्णालयात डेंग्यूचे रु ग्ण असताना पालिकेने केवळ डेंग्यूचे २१ रु ग्ण असल्याचा दावा केला होता. एव्हरशाईन येथील सामाजिक कार्यकर्ते मेलविन सिक्वेरा यांनी सांगितले की, माङया मुलाला देखील डेंग्यूची लागण झाली असून शहरातील अनेक ठिकाणी डेंग्यूचे रु ग्ण मोठ्या संख्येने आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
साथीच्या आजारांवर आम्ही लक्ष ठेवून
महापालिकेच्या साथ रोग विभागाच्या अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे यांनी सांगितले की, जानेवारी ते सप्टेंबर २०१८ पर्यंत २१ डेंग्यू चे रु ग्ण व ३५ ते ४० हिवतापाचे रु ग्ण आढळले आहेत. तसेच शहरात होणाऱ्या डेंग्यू रु ग्णांची यादी इतर रु ग्णालयातून मागवून त्यांची पुन्हा तपासणी करून उपचार केले जातात. व साथीच्या होणाºया आजारांवर आरोग्य विभागामार्फत पूर्ण पणे लक्ष दिले जात असते व वेळो वेळी याची जनजागृती करून अनेक ठिकाणी असे साथीचे आजार होऊ नये यासाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन केले जाते असे त्यांनी सांगितले.