वसई विरार मनपाला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:28 IST2025-03-07T16:28:29+5:302025-03-07T16:28:50+5:30

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये १) सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग २) सर्वोच्च कचरा संकलन तसेच ३) प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकल प्रात्याक्षिक या तीन श्रेणीमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले.

Vasai Virar Municipality ranked in International Book of Records | वसई विरार मनपाला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन

वसई विरार मनपाला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन

नालासोपारा (मंगेश कराळे) :- आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त सर्व १३ किनारी राज्यांमध्ये राज्य सरकार/स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम/मोहिम २१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्याचे पर्यावरण व हवामान बदल विभाग, राज्य शासन यांनी निर्देश दिले होते. राष्ट्रीय किनारपट्टी कचरामुक्त करणेसाठी प्रोत्साहित करणे, जागतिक महासागर आणि जलमार्गांचे जतन व संरक्षण करण्याबद्दल लोंकामध्ये जागृकता निर्माण करणे हे हा दिवस साजरा करण्याचा मुळ उद्देश होता. त्याअनुषंगाने २१ सप्टेंबरला विरारच्या राजोडी बिच येथे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार मनपा व गो-शुन्य प्रा. लि. यांच्या सहयोगाने स्वच्छता मोहिम राबविणेत आली.

सदर मोहिमे अंतर्गत शहरातील स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, एनसीसी व एनएसएस विद्यार्थी, महिला बचतगट, लोकप्रतिनिधी, पत्रकार वर्ग, सामान्य नागरीक, तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग असे एकुण १५ हजाराहून अधिक सहभागी उपस्थित होते. एकुण ५३ मेट्रिक टन कचरा संकलन करून त्यातील ६६२ कि.ग्र. प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकल प्रात्याक्षिक नागरीकांना दाखविण्यात आले.

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये १) सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग २) सर्वोच्च कचरा संकलन तसेच ३) प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकल प्रात्याक्षिक या तीन श्रेणीमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले.

वसई विरार शहराला विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टी स्वच्छता मोहिमेतून स्वच्छता, कचऱ्याचे विलगीकरण, रिसायकल, पुनर्वापर, प्लास्टिकचा कमीत कमी वापर आदि संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सदर उपक्रम राबविण्यात आलेला होता.

समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेऊन, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मनपाने सुरू केलेली ही मोहिम, केवळ आजची आवश्यकता नाही, तर आगामी पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. महापालिका, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या मदतीने समुद्र किनाऱ्यांच्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. - अनिलकुमार पवार, (आयुक्त)

Web Title: Vasai Virar Municipality ranked in International Book of Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.