खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 02:47 AM2018-09-23T02:47:37+5:302018-09-23T02:47:49+5:30

वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.

Vasai-Virar water problem will ends | खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार

खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार

Next

नालासोपारा - वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय देहर्जे ह्या महापालिकेच्या मालकीच्या धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे खोलसापाडा हे महापालिकेच्या मालकीचे दुसरे धरण होणार आहे.
वसई विरार पालिकेने पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा या साठी गेल्या काही वर्षात विविध योजना हाती घेतल्या आहेत. सूर्या पाणी पुरवठा योजने बरोबरच देहरजी धरणाचे काम हि युद्ध पातळीवर सुरु ठेवले असून त्या जोडीलाच पालिकेने राजावली, सातिवली व तिल्हेर साठवण तलाव बांधण्यासाठीं महासभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या योजनांसाठी वेगवेगळ्या मंजुऱ्या मिळविण्याचे काम ठाणे पाटबंधारे विभागाकडून सुरु असतांनाच आता खोलसापाडा धरणास केंद्रीय वन विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे.त्यामुळे महापालिका क्षेत्राला जलपुरवठ्याचा वेगळा पर्याय निर्माण झाला आहे. या प्रकल्पातील जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासाठी काल झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच या प्रकल्पाचा ठेकेदार पाठबंधारे विभाग असेल असा ठरावही करण्यात आला .
खोलसापाडा योजने अंतर्गत पाणलोट क्षेत्र हे ३.६४ किमी इतके असणार आहे. या प्रकल्पातून पालिकेला प्रतिदिन १४ द. ल. लीटर पाणी मिळणार आहे. हे पाणी जलसंपदा विभाग मार्फत (कोकण पाठबंधारे विकास महामंडळ) आरक्षित करण्यासाठी व तो पूर्ण मालकी तत्वावर राबवून घेण्यास आणि त्यासाठी येणाºया अंदाजपत्रकीय ३५ कोटीच्या खर्चास सभेने मंजुरी दिल्याने आता खोलसापाडा योजनेस गती मिळणार असून वसई विरारकरांसाठी पाण्याचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होणार आहे.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच पाणी प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. सूर्या योजना हे त्याचेच उदाहरण आहे. त्या पाठोपाठ देहरजी प्रकल्प, राजावली ,सातिवली,तिल्हेर,कामण अशा वेगवेगळ्या योजनांवर युद्धपातळीवर काम सुरु आहे. या योजना सुरु झाल्यास या ठिकाणी पाण्याचा प्रश्न राहणार नाही. अवघ्या ९ वर्षाच्या महापालिकेच्या मालकीची दोन स्वत:ची धरणे आता अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न सुटणार आहे.
- रु पेश जाधव, महापौर, वसई विरार महानगरपालिका.

मुंबईला लागून वसई विरार पालिका असल्याने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिला पुरेसे पाणी मिळावे यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. आजही महापालिका क्षेत्रातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नव्याने होणाº्या योजनांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही . शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचे धडे दिलेत. विरोधक असालो तरी चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिल.
-किरण चेंदवणकर , विरोधी पक्षनेत्या वसई महापालिका

Web Title: Vasai-Virar water problem will ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.