वाढता उकाडा अन् वाहतूककोंडीच्या जाचाने वसई-विरारकरांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:23 AM2019-03-28T00:23:11+5:302019-03-28T00:23:20+5:30
वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
वसई : वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
महापालिका आणि वसई वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव लक्षात घेता वेळीच या कोंडीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. वसई, अंबाडी रोड, माणिकपूर नाका तसेच पापडी, आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारा वसई पूर्व विभाग म्हणजेच गोखिवरे रेंज आॅफिस आणि सातिवली दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. दरम्यान वसई (पूर्व) हा तालुक्यातील एक मोठा औद्योगिक पट्टा असून साधारण वीस हजारांहुन अधिक महिला - पुरूष असा कामगार वर्ग रोज येथून प्रवास करतो. मात्र, सर्वांचा प्रवासाचा वेळ हा वाहतूक कोंडीतच जातो. तसेच डावीकडे गुजरात आणि उजवीकडे मुंबईला जोडणाऱ्या महामार्गवार जाण्यासाठी गोखिवरे व सातिवली अशा दोन स्थानिक महामार्गाचा वापर करावा लागतो. येथील गोखिवरे रेंज आॅफिस आणि तिथे सातिवली अशा दुहेरी ठिकाणी वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.
कोंडीचा सर्वाधिक त्रास दुचाकींना
शहरातील वाहतूक कोंडीमुळे चालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. त्यात सर्वाधिक त्रास दुचाकी धारकांना होत असून गाडीचे क्लच, गियर आणि ब्रेक यावर नियंत्रण ठेवता -ठेवता हाताची तसेच पायाला फारच त्रास होतो. गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान प्रवास करायला तब्बल एक तासाचा कालावधी लागत आहे.
अंबाडी रोड आणि माणिकपूर
नाक्यावर वाहतूक पोलीस गायब
वसई अंबाडी रोड आणि माणिकपूर या दोन मुख्य नाक्यावर चार रस्ते एकत्रित येतात. या ठिकाणी दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. तर सायं. ६ ते ९ दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मात्र, नेमकी कोंडीच्या वेळीच वाहतूक पोलीस देखील बºयाच वेळा गायब राहतात.
रुग्णवाहिका
देखील कोंडीत?
गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ६ ते ९ दरम्यान वसई वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कधी कर्तव्यावर असतात तर कधी नसतात. पोलीस नसल्यास चालक आपल्या मनाप्रमाणे वाहन चालवतात. वाहतूक पोलिसांचे नियोजन तसेच निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे चालकांकडून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही. आणि रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यास त्याचे प्राणसुद्धा जाऊ शकतात.
अंबाडी जुना रेल्वे उड्डाणपूल बंदच
वसई (पूर्व) ते वसई (पश्चिम) असा जोडणारा रेल्वे उड्डाण पूल तीन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद आहे. यामुळे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या संदर्भात वसई विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे बाबीवर प्रकाश पडला.
वसई-पूर्व अंबाडी रोड ते गोखिवरे रेंज आॅफिस दरम्यान होणारी वाहतूक कोंडी बाबत वसई विरार महापालिकेनं मधल्या काळात रस्ता रु ंदीकरण कार्यक्र म हाती घेतला असून ग्रामस्थांशी चर्चा करून वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत होईल याबाबत ठोस पाऊले उचलली आहेत. अजून १५ ते २० दिवसानंतर ही वाहतूक कोंडी बºयापैकी मुक्त होईल, तसेच अंबाडी रोड येथील परिवहनच्या बसेस पार्कींगमधून काढून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे, त्यातच निवडणुका लागल्याने वाहतूक पोलीस व इतर ठिकाणचा बंदोबस्त पाहता थोडी कमी आहे पण आम्ही काळजी घेऊ !
- संपतराव पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा