अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 11:44 PM2021-09-13T23:44:02+5:302021-09-13T23:44:11+5:30

वारंवार वीज होतेय खंडीत; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

in vasai water logging in Maswan pumping station and Dhukatan filter plant due to heavy rain | अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

Next

- आशिष राणे

वसई: मागील दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे येथील वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर गाळ साचला असून हे दोन्ही प्लांट पूर्णपणे सूर्या नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.

दरम्यान याठिकाणी वारंवार वीजखंडीत होत असल्याने  पाऊस कमी होईपर्यंत शहरांतील नागरिकांना कमी दाबाने व  अनियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे
नागरिकांची पाण्यापासून गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा नियंत्रक यांच्या वतीनं सोमवारी रात्री उशिरा ही माहिती लोकमत ला देण्यात आली  आहे
नियंत्रक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पालघर जिल्ह्यात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सूर्या योजनेतील धामणी धरण शंभर टक्के भरले असून ते ओसंडून वाहत आहे किंबहुना धामणी धरणाचे पाचही दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून धरणातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग ही सुरू आहे त्यात सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा ही दिला आहे
मात्र अतिवृष्टीमुळे येथील मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर  गाळ साचला असून  सूर्या नदीला पुर आल्याने हे दोन्ही प्लांट पूर्ण पणे पाण्याखाली गेले आहेत

अतिवृष्टीमुळे वीज होतेय खंडित; जॅकवेलही करावा लागतोय दुरुस्त
जोरदार अतिवृष्टी व सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे  मासवण पंपिंग स्टेशन चा काही भाग पाण्याखाली गेला असल्याने त्या पुराच्या पाण्याबरोबर मोठा गाळ, केरकचरा वाहून येऊन तो मासवण पंपिंगच्या जॅकवेलमध्ये गाळ येऊन पंप नादुरुस्त होत आहेत.
त्यामुळे पंपिंग बंद करून पाणबुडी जॅकवेलमध्ये उतरवून जॅकवेलमधील गाळ वारंवार साफ करावा लागत असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

कुठल्याही क्षणी वीज होऊ शकते खंडित?
दरम्यान पालघर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी ,जोरदार वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत दोन वेळा मासवण पंपिंग स्टेशन व  धुकटन फिल्टर प्लांट येथे वीज पुरवठा खंडित झाला असून पुढेही विद्युत पुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी वरील कारणांमुळे वसई विरार शहराला होणारा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस अनियमित आणि कमी प्रमाणात होऊ शकतो तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे  असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.

Web Title: in vasai water logging in Maswan pumping station and Dhukatan filter plant due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.