वसई पर्यटन विकासासाठी पाच कोटी मिळवून देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:50 AM2018-02-20T00:50:55+5:302018-02-20T00:51:19+5:30

मुंबईकरांनी गोव्याला जाण्या ऐवजी गोव्यासारखे सौंदर्य , सागरी किनारे व लज्जतदार जेवण जेथे मिळते त्या वसईतील किनारपट्टीला भेट द्यावी.

Vasai will get Rs 5 crore for tourism development! | वसई पर्यटन विकासासाठी पाच कोटी मिळवून देणार !

वसई पर्यटन विकासासाठी पाच कोटी मिळवून देणार !

googlenewsNext

पारोळ : मुंबईकरांनी गोव्याला जाण्या ऐवजी गोव्यासारखे सौंदर्य , सागरी किनारे व लज्जतदार जेवण जेथे मिळते त्या वसईतील किनारपट्टीला भेट द्यावी. जे जे गोव्यात आहे तेच इथेही आहे. मात्र पर्यटनाच्या दृष्टीने असणा-या सोयी सुविधा अधिक दर्जेदार करणे महत्वाचे असून त्यासाठी राज्य सरकरकडून पाच कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी केली.
गेल्या दोन दिवसांपासून वसईच्या निसर्गरम्य अर्नाळा समुद्रकिनारी सुरु असलेल्या अर्नाळा महोत्सवाचे उद्घाटन त्यांनी रविवारी केले. तेव्हा ते बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, वसईचे तहसीलदार किरण सुरवसे, सरपंच हेमलता बाळशी, रामदास मेहेर, जितेंद्र मेहेर, रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव निजाई, भरत भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते अर्नाळ्यातील राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियन करणं हेगिस्ते, रणजीपटू विनायक भोईर , उत्कृष्ट शेतकरी भूषण म्हात्रे, ओनील अल्मेडा व मी जागृत बंदरपाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. हा महोत्सव प्रथमच होत असून अर्नाळ्या मधून नुकतेच निवडून आलेले भाजपा उपसरपंच महेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायत अर्नाळा यांच्या माध्यमातून साकार झाला.
दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या महोत्सवात खवय्यांना आगरी व कोळी पद्धतीचे अत्यंत रु चकर व शारीरिक स्वास्थ्याला उपायकारक पदार्थ खायला मिळाले. त्यासाठी सदर महोत्सवात अनेक स्टॉल लावण्यात आले होते.
याच बरोबर येथील संस्कृती, परंपरांचे व राहणीमानाचे दर्शन घडविणारे अनेक कार्यक्र म कलाकारांनी दोन दिवस सादर केलेत. दोन दिवसांच्या या महोत्सवाला नागरिकांनी खूप मोठ्या उपस्थितीत हजेरी लावली होती.

ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात शिवकालीन, पोर्तुगीज, पेशवेकालीन ते इंग्रजांच्या काळातील शस्त्रांचा व ऐतिहासिक वस्तूंचा समावेश होता. वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येथील सागरी किनाºयावर वाळूशिल्प साकारून महोत्सवाला अधिक रंगत आणली होती.

Web Title: Vasai will get Rs 5 crore for tourism development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.