वसईत येते १० दिवस तीव्र वाहतूककोंडीचे, मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:39 AM2019-05-10T00:39:13+5:302019-05-10T00:40:29+5:30
वसई विरार शहर मनपाच्या एच प्रभाग समिती अंतर्गत माणिकपूर नाका ते पार्वती क्र ॉस या मुख्य रस्त्यावर आज गुरुवार दि.९ मे पासून मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामास प्रारंभ होत आहे.
वसई - वसई विरार शहर मनपाच्या एच प्रभाग समिती अंतर्गत माणिकपूर नाका ते पार्वती क्र ॉस या मुख्य रस्त्यावर आज गुरुवार दि.९ मे पासून मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामास प्रारंभ होत असून महापालिकेतर्फे या भागातील जुनी व जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी बदलून त्याऐवजी ६५० मिलि मीटर व्यासाची लोखंडी मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
जलवाहिनी टाकण्याच्या काळात याठिकाणी नागरिकांना मात्र सकाळ -संध्याकाळ मोठ्या वाहतूककोंडीला सामोरं जावे लागणार हे हि तितकंच सत्य आहे.
दररोज येथील प्रचंड वाहतूक कोंडी त्यात स्टेशन ते माणिकपूर भागात मुख्य रस्त्यावर उभी असलेली बेकायदा दुचाकी व चारचाकी वाहने त्यामुळे वाहचालक व प्रवासी आधीच मेटाकुटीस आलेला आहे.
परंतु विकासाची कामे पूर्ण होणे हे हि तितकेच गरजेचे असून त्यासाठी नागरिक सहकार्य हि करायला तयार आहेत मात्र त्यासाठी पालिका आयुक्त,वाहतूक शाखा व पोलीस यंत्रणा यांनी संयुक्तरित्या त्यांचा एक्शन प्लॅन शहरातील नागरिकांसमोर योग्य पद्धतीने त्रास न होता व गैरसमज न पसरता समोर ठेवणे अपेक्षित आहे. किंबहुना सकाळी नोकरी धंदयासाठी जाणाऱ्या शहरवासीयांची मोठी कोंडी होणार नाही. या संदर्भात महापालिकेच्या एच प्रभागाचे सहा.आयुक्त गिलसंन घोन्साल्वीस व उपअभियंता आर के पाटील यांनी नागरिकांनी जसा जमेल तसा भुईगाव गास या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. मात्र दरम्यानच्या काळात या वाहतूककोंडीचे नियोजन कसे होणार? याचे कुठलीही पूर्वकल्पना जनतेला न देता तडकाफडकी काम सुरु करू नका असे पालिकेला सांगतो असे वाहतूक शाखा निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले.
मुळातच हे काम सुरु होत असल्याने पापडी ,भाबोला, स्टेला व मेरीविला- माणिकपूरवासियांचा अजिबात विचार झालेला नाही. त्यांना मात्र या कोंडीतून मार्ग काढीत व आपल्या नियोजित वेळेच्या तासभर आधीच घरातून लोकंल पकडण्यासाठी निघावे लागणार आहे. या सर्व प्रश्नी वाहतूक कोंडी व नागरिकांचा पर्यायी रस्ता आणि भाबोलावासियांची कैफियत ऐकल्यावर पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले की आता वसई स्टेशन ते माणिकपूर पर्यंतची बेकायदा पार्किंग हटवली जाऊन हे खोदकाम व जलवाहिनी टाकण्याचे काम रात्रीच केले जाईल असं आयुक्त बळीराम पवार यांनी लोकमतला सांगितले.
काम कुठून कुठपर्यंत ?
माणिकपूर येथील हनुमान मंदिरापासून या कामाला सुरु वात करून माणिकपूर पार्वती क्र ॉस येथे काम संपवले जाणार आहे.या मुख्य कामासाठी पालिकेला साधारण दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून साधारण १९ मे पर्यंत हि मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू राहणार आहे.
मुख्य जलवाहिनी कामासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार असल्याने वाहतूककोंडी होणे स्वाभाविक असून त्यामुळे जनतेची गैरसोय तर होणार आहे, या पार्श्वभूमीवर जनतेने मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असणाºया कालावधीत वेळेआधी व मिळेल त्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा असेही आवाहन महापालिकेने केले आहे.
आपण वाहतूक शाखा व महापालिकेचा अतिक्र मण विभाग यांना निर्देश देऊन संयुक्तरित्या या काळात मुख्य रस्त्यावर बेकायदा पार्किंग होणार नाही, याची काळजी घेऊच मात्र दिवसा हे काम सुरु राहणार नसून नागरिकांचा अमूल्य वेळ,एक लेन म्हणजेच स्टेशन कडे जाणाºया रस्त्याच्या डाव्या बाजूला होणारे खोदकाम त्यामुळे रस्त्याची एकच बाजू सुरु राहील नागरिकांना याचा त्रास व वाहतूक कोंडी होऊ नये याकरता खास करून हे काम रात्रीच्या वेळी सुरु राहून ते पूर्ण केले जाईल
- बळीराम जी पवार,
पालिका आयुक्त,
वसई -विरार मनपा