वसईत बेकायदा वाहतूक
By admin | Published: October 11, 2016 02:33 AM2016-10-11T02:33:46+5:302016-10-11T02:33:46+5:30
विरार आणि नालासोपारा शहरात आता बेकायदेशिरपणे सहा आसनी मॅजिक रिक्शांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. तर नवघर-हावे रस्त्यावर खाजगी
शशी करपे / वसई
विरार आणि नालासोपारा शहरात आता बेकायदेशिरपणे सहा आसनी मॅजिक रिक्शांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. तर नवघर-हावे रस्त्यावर खाजगी बसमधून प्रवाशी वाहतूक जोरात सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाहतूकीचे सर्व नियम डावलून क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी वाहून नेण्याची हिंमत खाजगी वाहतूकदार दाखवत आहेत.
नालासोपारा पूर्वेली तुळींज पोलीस स्टेशनलगत संध्याकाळी सहा नंतर सफे द रंगाच्या सहा आसनी मॅजिक रिक्शा प्रवाशी वाहतूक करीत आहेत. शंभरहून अधिक मॅजिक रिक्शा पोलिसांदेखत कायदेशिरपणे वाहतूक करीत असून क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी वाहून नेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
विरार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे कार्यालय आहे. त्यांच्या देखत पालिका हद्दीत परवानगी नसलेल सहा आसनी सफेद रिक्शा प्रवाशी वाहतूक करीत असताना कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
दरम्यान, वसई विरार परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा तयार करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक पोलीस सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात दरम्यान काही ठिकाणी पहावयास मिळतात.
शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशिर रिक्शा स्टँड आहेत. त्याठिकाणी मर्यादेपेक्षा जादा रिक्शा असल्याने वाहतूक कोंडी होत असले लोक त्रासलेले आहेत. त्यातच रिक्शा चालक किमान पाच प्रवाशी वाहून नेत असताना दिसतात. हा प्रकार रोखण्यासाठी तैनात असलेले पोलीस नाक्यावर कधीच दिसत नाहीत.
रिक्शा स्टँडवरून गायब असलेले पोलीस आता नव रस्त्यांवर दुचाकी आणि खाजगी वाहतुकदारांची कागदपत्रे तपासण्यात गुंग असल्याचे पहावास मिळते. ज्या रस्त्यांवर दुचाकी आणि मालवाहतूक होते त रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची गर्दी दिसून येते. त्यांच दिमतीला बिट मार्शलही दिसू लागले आहेत. बिट मार्शलना सतत मोटार सायकलवरून फिरत राहून गस्त घालण्याचे काम आहे. मात्र, आता बिट मार्शलही दुचाकी वाहनांची तपासणी करू लागले आहेत. पोलिसांकडून दुचाकी वाहनधारकांना दिला जाणारा छळ चर्चेला विष बनला आहे.