वसईत भव्य रक्तदान शिबिर
By admin | Published: September 26, 2016 01:55 AM2016-09-26T01:55:49+5:302016-09-26T01:55:49+5:30
नाणीज येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभरातील संप्रदायाच्या भक्तांकडून विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीले जात आहेत.
वसई : नाणीज येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभरातील संप्रदायाच्या भक्तांकडून विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाळा, निर्मळ व सेवाकेंद्राच्या संप्रदायाच्या भक्तांकडून रविवारी महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. हे रक्त भारतीय लष्कर व शासनाच्या रूग्णालयांना देण्यात येणार आहे.
संप्रदायाच्या राज्यभरातील ५० हजारांहून अधीक भक्तांकडून मरणोत्तर देहदानाचे फॉर्म भरण्यात आले होते. राज्यातील ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे हे फॉर्म सुपूर्त करण्यात आलेले आहेत. संकलीत रक्त सिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थॅलेसिमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंटसाठी वापरण्यात येणार आहे. १५ आॅक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहदान संकल्पपूर्तीचा सोहळा व काही दात्यांना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, कृषी राज्यमंत्री सदा खोत उपस्थीत रहाणार आहेत. तसेच १६ आॅक्टोंबर रोजी या सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय स्वंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, भूपृष्टमंत्री नितीन गडकरी, आरोग्यमत्री दीपक सावंत व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थीत रहाणार आहेत. (वार्ताहर)