वसईत होणार ८ एकराचे मार्केट यार्ड
By admin | Published: December 23, 2015 12:28 AM2015-12-23T00:28:09+5:302015-12-23T00:28:09+5:30
रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार ५५५ कोटींची तरतूद करताना शेतकरी व मच्छीमारांच्या उत्पादनाना रास्त भाव मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी वसई येथे आठ एकर जागेमध्ये मार्केट
पालघर : रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार ५५५ कोटींची तरतूद करताना शेतकरी व मच्छीमारांच्या उत्पादनाना रास्त भाव मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी वसई येथे आठ एकर जागेमध्ये मार्केट यार्ड उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. चिंतामण वनगा यांनी पालघर येथे एका कार्यक्रमात दिली.
पालघर येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक माहिती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. विलास तरे, जि. प. अध्यक्ष सुरेखा थोतले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, सय्यद अख्तर, तहसिलदार चंद्रसेन पवार, डॉ. केळकर इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. वनगा म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वावलंबी भारताचे स्वप्न पाहिले व त्यादृष्टीने ते प्रयत्नही करीत आहेत. परदेशी दौरे करून देशात पुरेशी गुंतवणूक आणण्याद्वारे विकास करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. तर लोकापर्यंत विविध योजना पोहचविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून पालघरमध्ये या आधीच विस्तारीत समाधन योजनेचे काम सुरू असून लाभार्थ्याचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपविभागीय अधिकारी दावभट यांनी सांगितले.
आजपासून तीन दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून प्रधानमंत्री, जनधन योजना, महिला सबळीकरण, अल्प संख्यांकासाठी १५ कलमी कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मत्स्यविभाग योजना, इ. विविध विभागाच्या योजनांचे स्टॉलर्स व योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले तर बचतगटाने तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉलही उभारण्यात आले होते. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला. (वार्ताहर)