वसईच्या बचत गटाच्या कापडी पिशव्या अमेरिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 03:16 AM2018-07-08T03:16:37+5:302018-07-08T03:16:56+5:30
भारतात प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय मनाल जातो मात्र अमेरिकेत कापडी पिशव्यांना प्रथम पसंती आहे. आता तर अमेरिकेने कापडी पिशव्यांची मागणी वसईच्या समृद्धी बचत गटाकडे केली आहे.
विरार : भारतात प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय मनाल जातो मात्र अमेरिकेत कापडी पिशव्यांना प्रथम पसंती आहे. आता तर अमेरिकेने कापडी पिशव्यांची मागणी वसईच्या समृद्धी बचत गटाकडे केली आहे. त्यामुळे भारतापेक्षा अमेरिकेमध्ये कापडी पिशव्या ची गरज जास्त प्रमाणत असल्याचे स्पष्ठ झाले आहे त्यामुळे आता वसई मध्ये तयार होणाº्या कापडी पिशव्यांची वारी अमेरिकेत होणार आहे. त्याचबरोबर बचत गटातील महिलांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे.
अमेरीकेतील बिफ्रेंड कंपनीच्या संचालिका रीचेल वॉन यांनी वसईतील समृद्धी बचत गटाकडे कापडी पिशव्यांची मागणी केली आहे. वॉन यांनी आधी या गटाला भेट दिली, त्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यात 300 कापडी पिशव्यांची आॅर्डर दिली आहे. आणखी दोन हजार कापडी पिशव्यांची मागणी त्या नोंदकवणार आहेत. अमेरिकेत खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी, शुबॅग व अन्य गोष्टींसाठी कापडी पिशव्यांचा वापर केला जाणार आहे. असे किरण बडे यांनी सांगितले.
त्या गेल्या काही वर्षापासून प्लास्टिक विरोधात लढा देतच होत्या. त्यासाठी त्यांनी आठवडे बाजार, वस्तू खरेदीची ठिकाणे तसेच रस्त्यावर उतरून जनजागृती करण्यासाठी मोहीम देखील राबवली आहे.
सर्वच प्रकारच्या प्लॅस्टीकवर बंदी घालावी
महाराष्ट्रात जरी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली असली तरी, ५० मायक्रॉन पेक्षा जास्त जाडी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर लोकांचा जास्त भर आहे. तो थांबविण्यासाठी सर्वच प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालावी कापडी पिशवी वापरण्याची लोकांना लाज वाटते. मात्र अमेरिकेत प्लास्टिक पिशवी हि तुच्छतेचे लक्षण मानले जाते त्यामुळे आता महाराष्ट्राने देखील सकरात्मक विचार करावा कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा असे श्रीधर शेळके यांनी लोकमतला सांगितले.