वसईचा पांढरा कांदा मुंबई बाजारी, एक जुडीला १४० ते १७० रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:46 AM2019-03-23T03:46:01+5:302019-03-23T03:46:23+5:30

वसईची सुकेळी देशभर प्रसिद्ध आहेतच. आता वसईच्या मातीत पिकलेला पांढरा कांदा नवी ओळख घेऊन मुंबई बाजारात उतरला आहे. नाशिकचा हायब्रीड पांढरा कांदा ग्राहकांना चकवा देत असताना वसईच्या या कांद्याच्या माळांना प्रचंड मागणी आहे.

Vasai's white onion is available in Mumbai market, a pair of 140 to 170 rupees | वसईचा पांढरा कांदा मुंबई बाजारी, एक जुडीला १४० ते १७० रुपये भाव

वसईचा पांढरा कांदा मुंबई बाजारी, एक जुडीला १४० ते १७० रुपये भाव

Next

- अजय महाडिक
मुंबई : वसईची सुकेळी देशभर प्रसिद्ध आहेतच. आता वसईच्या मातीत पिकलेला पांढरा कांदा नवी ओळख घेऊन मुंबई बाजारात उतरला आहे. नाशिकचा हायब्रीड पांढरा कांदा ग्राहकांना चकवा देत असताना वसईच्या या कांद्याच्या माळांना प्रचंड मागणी आहे. या विक्र ीतून आदिवासी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
तालुक्यातील भुईगाव, रानगाव, निर्मळ, गास, नवाळे या गावांत मुख्यत: या कांद्याची लागवड केली जाते. या कांद्यामध्ये अनेक औषधी गुण असल्यामुळेही त्याला मुंबईतील दादर, भायखळा बाजारांत मोठी मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेमध्ये दोन माळांची एक जुडी सुमारे १४० ते १७० रु पयांना विकली जाते. या माळांमध्ये ५५ ते ६० कांदे असतात. मात्र, याच माळांना मुंबईतील बाजारात १९० ते २२५ रुपये भाव मिळतो. पांढरा कांदा अनेक दिवस टिकतो, त्यामुळे अनेकजण या माळा विकत घेऊन साठवून ठेवतात. पापडी, मांडवी, सोपारा गाव, होळी, आगाशी अशा विविध आठवडाबाजारांमध्ये तसेच विरार, वसई भागांत हा कांदा सध्या मोठ्या प्रमाणात विकला जातो आहे.
औषधी गुणधर्म असलेल्या सफेद कांद्याच्या लागवडीला पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रारंभ केला आहे. औषधी गुणधर्मामुळे या कांद्याला ग्राहक अधिक पसंती देतात. सफेद कांद्याची पावडर किंवा पेस्ट तयार करण्याचे तंत्र शिकवल्यास जिल्ह्यात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. वसई तालुक्यातील भुईगाव, रानगाव हे सफेद कांद्याकरिता प्रसिद्ध असले, तरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या सफेद कांद्याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. दरम्यान पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा या तालुक्यांत पांढऱ्या कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. आठवडाबाजार आणि जत्रांमध्ये त्या कांद्याला मोठी मागणी असते. मात्र, १० गुंठ्यांपासून एक एकरापर्यंतच मर्यादित क्षेत्रात ही लागवड असल्याने त्याची नोंद अद्याप ज्या प्रमाणात कृषी कार्यालयाने घ्यायला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात घेतलेली नाही.
सागरी, नागरी व डोंगरी भाग असलेल्या या जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पांढरा कांदालागवडीचे प्रमाण जंगलपट्ट्यापेक्षा अधिक आहे. या जमिनीतील कांद्याला विशिष्ट चव असून या जमिनीत त्याचा आकारही मोठा होतो. भातकापणीनंतर प्रतिकिलो ६५० ते दोन हजार रुपये किमतीची बियाणे पेरली जातात. पुन्हा लागवडीसाठी ४० दिवसांचा कालावधी लागतो. साधारणत: डिसेंबर ते जानेवारी या काळात त्याची पारंपरिक पद्धतीने रोपणी (लागवड) केली जाते.

भुईगाव येथील शेतकऱ्यांकडून आम्ही कांद्याच्या माळा विक्रीसाठी आणतो. एका माळेच्या विक्रीतून आम्हाला २० ते ३० रुपये मिळतात. पांढºया कांद्यासोबत वसईची ताजी भाजी, केळी, पपई, नारळ अशी विक्र ी करतो.
- लाडकू वाघ, निर्मळ, कातकरीपाडा

अवेळी पावसाबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव, कांद्याच्या शेतीवर दुष्परिणाम

लाल कांद्याच्या अस्थिर होत असलेल्या किमतीने शेतकºयांसोबत ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असतानाच औषधी म्हणून ओळख असलेला वसईचा सुप्रसिद्ध पांढरा कांदा सध्या चर्चेत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पांढरा कांदा महाग झाला आहे.

उन्हाळ्यात कांद्याची बाजारात मोठी आवक असते. अनियमित हवामान, अवेळी पाऊस याबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या काही वर्षांत वसई पश्चिम पट्ट्यातील कांद्याची शेती कमी झाली आहे. भुईगाव, निर्मळ, गास, आगाशी, कोफराड, गिरीज, सत्पाळा इत्यादी भागांत पांढºया कांद्याचे पीक घेतले जाते.

प्रत्येक वर्षी मार्च-एप्रिलच्या सुमारास पांढºया कांद्याने वसईतील बाजारपेठा फुलून जात होत्या. मागील काही वर्षांत मान्सूनपूर्व पडलेला अवकाळी पाऊस तसेच मोसमी पावसाने दिलेल्या ओढीमुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या शेतीवर झाला असून बाजारात कांद्याची आवक घटली होती.

Web Title: Vasai's white onion is available in Mumbai market, a pair of 140 to 170 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.