वसईत भातकापणी सुरू, मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:11 PM2018-10-28T23:11:03+5:302018-10-28T23:11:22+5:30

तालुक्यात २०० ते २५० हेक्टरमध्ये भातपीक; उडवी रचणे, झोडणी करण्यास झाला प्रारंभ

Vasayet continues patriotism, employs laborers | वसईत भातकापणी सुरू, मजुरांना रोजगार

वसईत भातकापणी सुरू, मजुरांना रोजगार

Next

नालासोपारा : वसई तालुक्यात भाताचे पीक यंदा समाधानकारक आल्याने येथील बळीराजा सुखावला आहे. मात्र तयार झालेल्या भाताच्या ओंब्यांवर काही ठीकाणी कीड तर काही प्रमाणात करपाची लक्षणे दिसून येत होती. पण तरीही या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचे आढळून आले नाही.गेल्या महिन्यापासून निसवण्याच्या स्थितीत असलेल्या भातपिकाची कापणी सद्या सुरू झाली आहे. वसईच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागात आगाशी, उमराळे, गास, नाळा या गावांतील शेतकरी सध्या कापणीच्या तयारीत व्यस्त झाले आहेत.
भात हे वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे वसईची शेती संपुष्टात येऊ लागली आहे. अजूनही वसईच्या पश्चिम पट्टयातील गावांत काही प्रमाणात भातशेती होत आहे. आषाढ महिन्यात भातपेरणी होते आणि अश्विन महिन्यात कापणीला सुरूवात होते. भातशेतीसारख्या कष्टप्रद व्यवसायात मनुष्यबळाचा जाणवणारा तुटवडा, त्यातच वाढलेली रोजंदारी यामुळे शेतकरी आपल्या कुटूंबासह कापणी, झोडणी व उडबी रचण्यात मग्न आहे.

पूर्वपट्टीतही हळवा भाताच्या कापण्यांना सुरुवात
तालुक्याचा पूर्व भाग हा डोंगरदºयाचा आहे. या जमिनीत पावसाचे पाणी न साचता ओलावा धरून राहत असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ९० दिवसांचे पीक घेण्यात येते.रोग असला तरी हे पीक कापणीस तयार झाले आहे. वसई तालुक्यात चालू वर्षी चांगल्या झालेल्या पावसामुळे ९० ते १०० दिवसात तयार होणारे मध्यम जमिनीतील निम गरवे पीक व १०० ते १२० दिवसात तयार होणारे पाणथळ जमिनीतील गरवे पीक हे चांगल्या जोमाने तयार होते.

उडबी रचणे व भातपिकांची झोडणी...
शेतात भाताचे तयार झालेले पीक कापल्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हात पसरवून ठेवले जाते.त्यानंतर त्याचे झोडणीसाठी छोटे भारे बनविले जातात.काही ठिकाणी हे भारे ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धताने उडंबे गोलाकार बनवले जातात. हे उडबे शेतकरी झोडणी करणार असलेल्या शेतात कींवा आपल्या घराशेजारच्या मोकळ्या जागी शेणाने जमीन सारवून करतात. लाकडी टेबल किंवा ओंडक्यावर झोडणी केली जाते. काही ठीकाणी हल्ली यंत्राच्या साहाय्यानेही झोडणी होते.

Web Title: Vasayet continues patriotism, employs laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.