वसईत मिळते गोवर रुबेला सर्टिफिकेटची झेरॉक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:59 PM2019-01-01T23:59:41+5:302019-01-01T23:59:51+5:30
आधीच गोवर -रुबेला लसीकरण मोहिमेबाबत कही गम कही खुशी असे वातावरण असतांना आता या लसीकरण मोहीमे अंतर्गत लाभार्थ्यांना लसीकरणानंतर मूळ सर्टीफिकेट देण्याऐवजी त्याची झेरॉक्स प्रत दिली जात असल्याचे आमची वसई संघटनेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निदर्शनास आणले आहे.
वसई : आधीच गोवर -रुबेला लसीकरण मोहिमेबाबत कही गम कही खुशी असे वातावरण असतांना आता या लसीकरण मोहीमे अंतर्गत लाभार्थ्यांना लसीकरणानंतर मूळ सर्टीफिकेट देण्याऐवजी त्याची झेरॉक्स प्रत दिली जात असल्याचे आमची वसई संघटनेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निदर्शनास आणले आहे.
त्यांनी ही गंभीर बाब महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देखील त्याने त्याची कुठलीही दखल घेतलेली दिसून आली नाही, याउलट समोर मिळालेले उत्तर हे मात्र धक्कादायक असल्याचे हि कळते.
ढगे यांच्या माहितीवरून अंगणवाडी क्र .९६ मधे गोवर-रु बेला लसीकरण मोहीमेत मूळ सर्टीफिकेट चा वापर न करता चक्क त्याच्या झेरॉक्स प्रतीचा सर्रास वापर होत असतांना रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी पाहिले, त्यांनी तात्काळ येथील आरोग्य सेविकेला या मूळ सर्टीफिकेटची झेरॉक्स प्रत का वापरण्यात येते. याबाबत विचारले असता आरोग्यसेविकेने गोवर-रुबेला लसीकरण सर्टीफिकेटस संपली असून मागील आठ दिवसांपासून आम्ही आरोग्य विभागाकडे त्याची मागणी करत आहोत, ती मिळत नसल्यानेच आम्ही अशा झेरॉक्स पालकांना देतोय असे धक्कादायक उत्तर मिळाले.
दरम्यान याबाबत स्वत: राजेंद्र ढगे यांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सर्टीफिकेट आजच उपलब्ध झाली आहेत, असे उत्तर मिळाले. तर ढगे यांच्या मागणीनुसार मागील काही दिवस ज्या बालकांचे लसीकरण केले आहे त्यांना आपण पुन्हा मूळ सर्टीफिकेट देणार आहेत का? असे विचारले असता त्यांनी काहीच ठोस उत्तर दिले नाही.
देशभर सुरु असलेली गोवर-रुबेला लसीकरण मोहीम याआधीच वादात आहे आणि असे असताना देखील सर्टीफिकेटची झेरॉक्स प्रत लाभार्थी पालकांना देणे हे कितपत योग्य आहे याची कुणीच कशी पर्वा करत नाही. आणि त्यात या सर्टीफिकेटची झेरॉक्स महा पालिकेच्या आरोग्य विभागाने साक्षांकित केली नसल्याने त्याची वैधता किती आहे हे मात्र कळण्यास मार्ग नाही.
सर्टीफिकेटस नसताना मोहीम राबवणे हे उचित नाही. अशी चर्चा आरोग्य क्षेत्रामध्ये व शिक्षणक्षेत्रामध्ये सुरू आहे. त्याचे कोणते उत्तर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे.
नवा भ्रष्टाचार उघडकीस येणार?
सर्टीफिकेट च्या नावाने नवीन भ्रष्टाचार उघडकीस येईल का असा हि संशय व्यक्त होत आहे. गोवर-रुबेला लसीकरण दर्जा गुणवत्तेबाबत चर्चा सुरू असताना हे झेरॉक्स प्रकरण मोहिमेला ब्रेक लावणार तर नाही ना ? याची आता धास्ती वाटते.
पालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेउन संबधीत पालकांना मूळ सर्टीफिकेट मिळेल व पुन्हा असे दाखले कमी पडणार नाहीत अशी व्यवस्था करावी.