वसईला सूर्याचे १०० एमएलडी!

By admin | Published: January 1, 2017 03:53 AM2017-01-01T03:53:48+5:302017-01-01T03:53:48+5:30

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे

Vasica Sun 100 MLD! | वसईला सूर्याचे १०० एमएलडी!

वसईला सूर्याचे १०० एमएलडी!

Next

- शशी करपे,  वसई
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षापासून वसईकरांची तीव्र पाणी टंचाई दूर होणार आहे.
वसईकरांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी १०० एमएलडी सूर्या पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळाली होती. २०१४ मध्ये योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेतून १ मार्च २०१५ पर्यंत १०० एमएलडी पाणी पुरवठा सुरु होणार होता. याच प्रश्नावर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता हस्तगत केली होती. परंतु वनखात्याने खोडा घातल्यानंतर ही योजना रखडून पडली होती. महापालिका निवडणुकीनंतर सहा महिन्या पाणी आणू, अशी घोषणा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने केली खरी पण, दीडवर्षे उलटून गेल्यानंतरही पाणी पुरवठा सुुरु न झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुुरुवात केली होती.
मात्र, नव्या वर्षात या योजनेच्या कामाला गती देऊन येत्या तीन महिन्यात पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही योजना तीनशे कोटींची आहे. मात्र, कामाला सुरुवात झाल्यापासून अनेक अडथळे येऊ लागले आहेत. या योजनेतील जलवाहिन्या वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जाणार आहेत. याठिकाणी ११०० झाडे असल्याने वनखात्याने आक्षेप घेतला होता. महापालिका प्रशासनाने प्रयत्न करून वनखात्याला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे पर्यायी जमीन मिळवून दिली. त्यानंतर वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यातच यातील काही क्षेत्र संरक्षित वने अंतर्गत राखीव असल्याने हरित लवादाने त्याला आक्षेप घेतल्याने काम पुन्हा रखडून पडले होते. यातील याचिकाकर्त्या शोभा फडणवीस यांना लवादाने पक्षकार म्हणून घेतले होते. लवादाने सुनावणी घेतल्यानंतर वनखात्याला ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंत्रालयात प्रमाणपत्र सादर झाल्यानंतर लवादाने कामाला हिरवा कंदील दाखवला होता. वनखात्याने पोलादपूरच्या १५ एकर जागेचा सातबारा नावावर झाल्याशिवाय या मार्गातील झाडे कापणार नाही, अशी भूमिका घेतली १५ एकर जागेपैकी काही जागेचा सातबारा वनखात्याच्या नावावर झाला आहे. उर्वरित सातबारा येत्या दोन-तीन दिवसात नावावर होणार असल्याची माहिती शहर अभियंत्यांनी दिली.

११०० झाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये यापूर्वीच जमा केले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सातबारा नावावर झाल्यानंतर वनखात्याकडून झाडे कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर त्याजागेतून जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात होणार आहे.
वाहिन्या टाकण्याचे काम दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे येत्या तीन महिन्यात वसईकरांना आणखी १००एमएलडी पाणी पुरवठा सुरु होईल. सध्या वसईकरांना सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंंड धरणातून १ एमएलडी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. त्यात आता आणखी १०० एमएलडी पाण्याची भर पडणार आहे. अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी दिली.

Web Title: Vasica Sun 100 MLD!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.