हक्काच्या पाण्यासाठी वसईत समितीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:52 PM2019-06-05T22:52:10+5:302019-06-05T22:52:21+5:30
६९ गावांची पाण्याची योजना : लवकरात लवकर सुरु करा ....घोषणा दुमदुमली
वसई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वसईतील पर्यावरण संवर्धन समिती वसई- विरार तर्फे 69 गावांची प्रलंबित राहिलेली पाण्याची योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी वसई पश्चिमेतील निर्मळ येथे पाणी योजनेतील त्या रिकाम्या जलकुंभा समोर शेकडो कार्यकर्त्यानी बुधवारी सकाळपासुन धरणे आंदोलन केले.
निर्मळ गावात उभ्या असलेल्या या रिकाम्या जलकुंभात जोपर्यंत पश्चिम पट्टीतील 69 गावातील नागरिकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरूच राहण्याच्या घोषणेने येथील परिसर दुमदुमुन गेला. या प्रसंगी प्रसिध्द पथनाट्यकार व जेष्ठ रंगकर्मी झुराण लोपीस व त्यांचे सहकारी डायगो लोपीस व मॅक्सवेल रोझ यांनी या धरणे आंदोलना स्थळी या आंदोलनपर गीतांच्या द्वारे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.
यावेळी प्रशासनाला ठासून सांगताना वर्तक यांनी वसई विरार महापालिकेला त्यांच्या अधिकार व कर्त्यव्याची आठवण करून देत स्पष्ट केले की, सध्या स्थितीत 69 गावे वसई विरार महापालिकेत येत असून मा. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यातील महापालिकाना स्पष्ट निर्देश आहेत कि प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे बंधनकारक आहे,असे असताना हि मागील अनेक वर्षे झाली हि योजना कार्यांवित असून देखील महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याबाबत उदासीनता दाखवली आहे,याचा जाब विचारण्यासाठी वेळ पडली तर आम्ही गावकरी आमरण उपोषण ही करू असे ही यावेळी आंदोलनकर्ते ग्रामस्थ व वर्तक यांनी स्पष्ट केले.
किंबहुना दि.31 मार्च 2019 पर्यंत हि योजना पूर्ण होऊन पाणी मिळणार असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत यापूर्वी लेखी आश्वासन वर्तक यांनी दिले होते मात्र रिकाम्या जलकुंभ व्यतिरिक्त याठिकाणी ना महापालिका पुढे सरसावली ना जीवन प्राधिकरण योजना पुढे सरकली केवळ आतापर्यंत गावकर्यांना लटकवत ठेवण्यात आले.आणि म्हणूनच पुन्हा प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी पर्यावरण दिनी असे आंदोलन छेडावे लागले असल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली,
या आंदोलना वेळी पर्यावरण संवर्धन समतिीचे समन्वयक व आंदोलनकर्ते समीर वर्तक, शशी सोनावणे, जण आंदोलनाच्या नेत्या कु.डॉमिनिका डाबरे, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे व माजी उपसरपंच सुनील डाबरे, आदिवासी एकता परिषदेचे वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे, मनसेचे प्रफुल्ल ठाकूर ,तसेच प्रामुख्याने भुईगाव, वाघोली, निर्मळ, गास परिसरातील आण िसंपूर्ण वसईतून अनेक जेष्ठ व तरु ण कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलनकर्त्यांची बोळवण
पर्यावरण दिनी वसईच्या पश्चिम पट्टीतील ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धन समतिीच्या माध्यमाने निर्मळ येथील रिकाम्या जलकुंभा च्या ठिकाणी केलेल्या धरणे आंदोलनाची गंभीर दखल घेत आश्चर्य म्हणजे वसई विरार मनपाचे शहर अभियंता माधव जवादे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना या आंदोलनाची दखल व निवेदन घेण्याचे लेखी पत्र च धाडले असल्याने एकप्रकारे आपली जबाबदारी झटकली आहे.