‘लालपरी’साठी वसईकर एकवटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:04 PM2020-02-18T23:04:01+5:302020-02-18T23:04:20+5:30
चौकसभांतून जनजागृती : एस.टी.चा मार्ग मोकळा करण्यासाठी सुरू केली चळवळ
विरार : वसईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली मात्र शहरातून हद्दपार झालेली एस.टी. आता पुन्हा शहरात धावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी शहरातील ग्रामस्थ एकवटले असून एक चळवळ उभी केली जात आहे. या चळवळीतून वसईच्या पश्चिम पट्ट्यात चौकसभांच्या माध्यमातून जनजागृती सुरू झाली आहे.
एस.टी. म्हणजे ग्रामीण भागातील प्रवाशांचा मोठा आधार असतो. वसईकरांसाठी ही एस.टी. महत्त्वपूर्ण भूमिका बजवायची. निव्वळ प्रवासाचे साधन सोडाच वसईकरांची अर्थव्यवस्थाच या एस.टी.शी निगडित होती. कारण वसईच्या शेतात पिकणारा ताजा भाजीपाला, फुले, दूध याच एस.टी.तून शहराबाहेर विक्रीसाठी नेला जात होता. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था एस.टी.वर टिकून होती. मात्र प्रवाशांच्या हक्काची व जिव्हाळ्याची एस.टी. २०१७ साली वसई-विरारमधून तोट्याचे कारण देत हद्दपार झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले होते.
तरीही एस.टी. फेऱ्या बंदच्या विरोधात वसईतील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलन केली होती, मात्र याचा काहीही एक फायदा झाला नाही.दरम्यान, जशी एस.टी. सेवा बंद झाली तशी वसई विरार महापालिकेने २०१२ साली ठेकेदार स्वरूपात परिवहन सेवा सुरू केली. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे परिवहन सेवेविरोधात अनेक तक्र ारी पुढे येऊ लागल्या. यामध्ये निकृष्ट दर्जाच्या बस, प्रदूषणकारी धूर ओकणाºया बसेस, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
वाहतूक, शासनाला न भरलेला प्रवासी कर आणि बालपोषण अधिभार, वाहनतळ नसल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय, परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार, सततचा संप अशा अनेक समस्या पुढे येत होत्या. त्यातच २०२० वर्ष उजाडल्यावर या समस्या वाढतच गेल्या.
परिवहन कर्मचाºयांचा पगार वेळेवर न झाल्याने व इतर विविध मांगण्यासाठी या कर्मचाºयांनी गेल्या दोन महिन्यात दोनदा परिवहन सेवा बंद पाडली होती. त्यामुळे ११ दिवस परिवहन सेवा बंद होती. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना व नोकरदार वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची ही मोठी गैरसोय झाली होती. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा अतोनात हाल झाले होते.
परिवहन कर्मचाºयांच्या आंदोलनांमुळे प्रवासी वैतागले
च्सततच्या होणाºया या आंदोलन व परिवहन समस्यांमुळे विविध वर्गातील प्रवासी या सेवेला वैतागले आहेत. त्यामुळे वसईतून हद्दपार झालेली एस.टी. पुन्हा सुरू व्हावी, यासाठी वसईतील आम्ही गासकर संघटना तसेच वसईतील अनेक सामाजिक संघटना यांनी मिळून एक चळवळ सुरु केली आहे.
च्यामध्ये चौकसभा घेऊन ग्रामस्थांना आवाहन करीत सर्वांनी आपल्या वैयक्तिक ई-मेल आयडीवरून परिवहनच्या विविध समस्या आणि एस.टी.ची मागणी हे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन सचिव, जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाची शहर बस-सेवा पुन्हा चालू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
च्पालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराच्या मनमानीनुसार चालत आहे. दोन महिन्यात तीन वेळा ही परिवहन सेवा बंद पडली. तसेच परिवहन सेवा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असताना पालिकेने त्याकडे लक्ष देण्याऐवजी महोत्सवी कार्यक्रमाकडे जास्त लक्ष दिले जात असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांनी केली.
परिवहन संपामुळे आमच्या गावातील चाकरमानी व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे परिवहन सेवा जर अशीच बंद होत राहिली तर प्रवास कसा करावा? त्यासाठी आम्हाला पुन्हा वसईत एस.टी. हवी आहे. म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे.
- जॉय फरगोस, आम्ही गासकर संघटना