नवरात्रीसाठी वसईकर सज्ज

By Admin | Published: September 30, 2016 03:04 AM2016-09-30T03:04:21+5:302016-09-30T03:04:21+5:30

नवरात्रीसाठी वसईत जोरदार तयारी सुुरु झाली आहे. मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. तर आजपासून मोठ्या मूर्ती घेऊन जाण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मूर्तीच्या

Vasikekar ready for Navratri | नवरात्रीसाठी वसईकर सज्ज

नवरात्रीसाठी वसईकर सज्ज

googlenewsNext

- शशी करपे,  वसई
नवरात्रीसाठी वसईत जोरदार तयारी सुुरु झाली आहे. मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. तर आजपासून मोठ्या मूर्ती घेऊन जाण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मूर्तीच्या किंमतींमध्ये सुमारे २० टक्यांनी वाढ झाली आहे. गरब्यासाठी मंडळांची लगबग सुरु आहे. जीवदानी मंदिरात नऊ दिवस होणाऱ्या उत्सवाची जोरदार तयारी सुुरु असून यंदाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर पोलिसांनीही वसई विरार परिसरात कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याासठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे.
वसईत नऊ दिवस गरब्यांची धूम असते. नवघर-माणिकपूर शहरात गुजराती परिवाराचा साई नगर मैदानात होणारा पारंपारिक पद्धतीने होणारा गरबा वसईतील मुख्य आकर्षण असते. यंदाही विविध कलाकारांच्या उपस्थितीत गुजराती परिवाराचा गरबा महोत्सव होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती मंडळाचे बिपीन खोखाणी यांनी दिली.
विरार येथील जीवदानी देवी मंदिरात नऊ दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमायेच आयोजन केले जाते. पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर दररोज नियमितपणे महाअभिषेक, वस्त्रालंकार, शृंगार, नैवेद्य, धूपारती, आरती, हवन पूजा, नवग्रह, गणेश पूजन, कलश पुण्यहवन केले जाते. तर नऊ दिवस दैनंदिन पूजा विधीसह दररोज पहाटे साडेपाच, दुपारी बारा आणि सायंकाळी साडेसात वाजता आरती केली जाणार आहे.गडावर नऊ दिवस मोफत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त पंकज ठाकूर यांनी दिली.
मंदिरात दररोज किमान पन्नास हजारांहून अधिक भाविक हजेरी लावतात. तर शेवटच्या दिवशी दोन लाखांहून अधिक भाविक गर्दी करतात. म्हणून सुरक्षेसाठी विविध शंभर जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. मंदिर व्यवस्थापनाने स्वत:चे ८० सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. त्याचबरोबर विवा कॉलेजचे एनसीसीचे तीनशे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून हजर राहणार आहेत. मेटर डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.

पोलीस यंत्रणा सज्ज
नवरात्रौत्सव शांततेत आणि कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धक्का न लागता सुरळीतपणे पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
पोलिसांनी मंडळांना वेळेत आणि आवाजात मर्यादा ठेऊनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

यंदाही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवासाठी २४ पोलीस अधिकारी, २०१ पोलीस कर्मचारी, १३५ होमगार्ड यांच्यासह तीन एसआरपी प्लाटून आणि दोन आरसीपीच्या तुकय्ऋ्या तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ३ डिएफएमडी, ५ एचएचएमडी आणि १५ वॉकीटॉकी टीम शहरात कार्यरत असणार आहेत. तसेच नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात येणार आहे.यंदाही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Vasikekar ready for Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.