वसईत गणेशमूर्तींना केवळ सात फुटांपर्यंतची मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:15 AM2018-09-01T03:15:34+5:302018-09-01T03:15:54+5:30
महापालिकेकडून निर्देश : घरगुती बाप्पांसाठीही केले आवाहन
पारोळ : गणेशमुर्त्यांच्या वाढत्या उंचीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी वसई विरार महापालिकेने यंदा गणेशमर्ू्त्यांना केवळ ७ फुटांपर्यंतच परवागनी दिलेली आहे. घरगुती गणपतींच्या मूर्र्त्यांची उंचीही कमी करून पर्यावरणपूरक मुर्त्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव जवळ आला असून महापालिकेने त्याची तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील असलेल्या स्पर्धांमुळे श्रींच्या मूर्तीची उंची वाढविण्यात येते. उंच मूर्ती या अनेक समस्येला कारणीभूत ठरत असतात विसर्जन मिरवणूकीतील वाहतूकीला अडथळा आणि विसर्जन करताना सर्वात मोठी अडचण निर्माण होते. यासाठी पालिकेने आता सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा घातल्या आहेत. सार्वजनिक मंडळांना केवळ ७ फूट उंचीच्या मूर्ती ठेवता येणार आहे. त्यापेक्षा अधिक उंचीच्या मर्ू्त्यांना परवागनी मिळणार नाही. यासाठी पालिकेने पोलिसांची मदत घेतली असून उंच मुर्त्या असल्या की, त्यांना विसर्जनालाच परवागनी देता येणार नाही. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेने मध्यवर्ती बैठक आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णयÞ घेण्यात आला. आता प्रभागनिहाय समन्वय समित्या स्थापन केल्या जाणार असून गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शक सुचना केल्या जाणार आहेत.
याबाबत बोलताना महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले की, उच्च न्यायालाने गणेशोत्वाबाबात मार्गदर्शक सुचना केलेल्या आहेत. त्याचे पालन करण्यात येणार आहे. परंतु मुर्त्यांची वाढती उंची अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी आम्ही उंचीवर मर्यादा घातली असून केवळ ७ फूटांपर्यंत उंचीच्या गणेशमूर्तींना परवानगी दिली आहे. तशा सूचना सर्व सार्वजनिक मंडळांना करण्यात येत आहे.
मुख्य समितीने केल्या सूचना
गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी पालिकेने पोलीस, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरण, आरोग्य विभाग, अशासकीय संस्था आणि सार्वजनिक गणेशमंडळांचे प्रतिनिधी यांची मुख्य समिती स्थापन केली आहे. नुकतीच या समितीने गणेशोत्सवासाठी शासनाचे तसेच न्यायालयाच्या विविध निर्णयÞाचे पालन आणि अंमलबजावणी करण्याबाबत यात चर्चा केली. तसेच मंडळ व घरगुती मुर्त्यांसंदर्भात सूचना जारी केल्या.
शाडू माती व कागदी लगद्यापासूनच्या मूर्त्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणातर्फे मंडपांकडून वीजेच्या जोडण्या तपासल्या जातील, तसेच अग्निशमन कडून ना हरकत दाखला देण्यात येणार आहे.