वस‌ई विरारमध्ये पेट्रोलपंपावर वाहनांची गर्दी; डिझेलचा साठा संपल्याचे बोर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 02:04 PM2024-01-02T14:04:36+5:302024-01-02T14:04:45+5:30

दुचाकी चालकांना पेट्रोल २०० रूपयांचे तर चारचाकी वाहनांमुळे २००० रुपयांचेच पेट्रोल

Vehicular congestion at petrol pump in Vasai Virar; Diesel out of stock board | वस‌ई विरारमध्ये पेट्रोलपंपावर वाहनांची गर्दी; डिझेलचा साठा संपल्याचे बोर्ड

वस‌ई विरारमध्ये पेट्रोलपंपावर वाहनांची गर्दी; डिझेलचा साठा संपल्याचे बोर्ड

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा - नवीन मोटर वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संपावर असल्याने इंधनाच्या  गाड्या शहर येणार नाहीत याच भीतीने वसई विरार मधील पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नुकताच केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे. या नवीन कायद्यानुसार दहा वर्षाची शिक्षा व लाखो रुपये दंडांची तरतूद आहे. तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर  कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे. अजूनही यावर तोडगा निघाला नसल्याने ट्रक चालक आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा परिणाम हा मालवाहतूक यासह इतर वाहतुकीवर होऊ लागला आहे. 

या संपामुळे इंधनाच्या गाड्या शहरात येतील की नाही या भीतीने नवीन वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी वसई विरार मधील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती. विरारच्या वटार येथील भारत पेट्रोलियमच्या पंपावर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या रांगा थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलिस पोलीस उपलब्ध नाहीत. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. डिझेलचा साठा संपल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. दुचाकी चालकांना पेट्रोल २०० रूपयांचे तर चारचाकी वाहनांमुळे २००० रुपयांचेच पेट्रोल दिले जात असल्यामुळे तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हा संप लवकरात लवकर मिटला नाही तर पुढील कालावधीत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

वस‌ई विरारमधील सर्वच पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळपासून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी गर्दी केली होती. विरार पुर्व व पश्चिम, अर्नाळा, वटार, नालासोपारा पूर्व व पश्चिमेकडील दोन पेट्रोल पंप, निर्मळ, भुईगाव, सागरशेत, स्टेला तसेच पुर्वेकडील नवघर पेट्रोल पंप, गोखीवरे आदी पेट्रोल पंपावर वाहनचालक एक ते दीड तास रांगेत उभे राहून आपापल्या वाहनात इंधन भरत होते‌.

Web Title: Vehicular congestion at petrol pump in Vasai Virar; Diesel out of stock board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.