वेलंकनी यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या लवकरच!, वसईतील भाविकांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:37 AM2019-07-05T00:37:26+5:302019-07-05T00:37:39+5:30
सई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक वेलंकनी मातेच्या दर्शनाला जातात.
पारोळ : तामिळनाडूतील नागपट्टीणम येथे वेलंकनी मातेच्या २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या उत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याने या यात्रेसाठी जाणाºया हजारो भाविकांना दिलासा मिळाला आहे. वसई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक वेलंकनी मातेच्या दर्शनाला जातात.
प्रत्येक वर्षी मुंबई, वसई व पालघर भागातून हजारो भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून २६ आॅगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते वेलंकनी व पश्चिम रेल्वे कडून २७ आॅगस्ट रोजी वांद्रे ते वेलंकनी अशा स्पेशल गाड्या सोडण्यात येतात. यावर्षीही मध्य व पश्चिम रेल्वेकडून दोन स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. व तद्संबधी घोषणा संबंधित रेल्वेकडून लवकरच करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना देण्यात आली. या घोषणेस विलंब होत असल्यामुळे मुंबई, वसई व पालघर भागांतील हजारो वेलंकनी भाविक मोठ्या चिंतेत होते. परतुं आता त्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेकडून दि.२७ रोजी वांद्रे ते वेलंकनी ही स्पेशल गाडी मागच्या वर्षाप्रमाणे रात्रौ ११ वाजता न सोडता ती सुमारे तीन ते चार तास अगोदर सोडावी. यामुळे ती गाडी वेलÞकनी येथे दि.२९ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या अगोदर पोहचेल. यामुळे पहिल्या दिवशी अति महत्त्वाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात भाविकांना सहभागी होता येणार आहे!
वेलंकनी मातेच्या यात्रेसाठी दोन खास रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली असून, याबाबत रेल्वेने लवकरच घोषणा करावी.
- चार्ली रोजारिया, अध्यक्ष,
वेलंकनी यात्रेकरू संघटना