वैतरणा रेल्वेस्थानकात सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:37 AM2019-04-16T00:37:40+5:302019-04-16T00:37:50+5:30

मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले

Vetarna railway station in safety | वैतरणा रेल्वेस्थानकात सुरक्षा वाऱ्यावर

वैतरणा रेल्वेस्थानकात सुरक्षा वाऱ्यावर

googlenewsNext

नालासोपारा : मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले असून येथील रेल्वे सुरक्षाही रामभरोसे आहे. या स्थानकाला उपनगरीय दर्जा असूनही आॅन ड्युटी जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नसतात.
३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अनुसया सुरेश भांगरे (६५) ही वृद्धमहिला वैतरणा स्थानकात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे लाइन पार करत असताना राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिल्याने त्यात ती मरण पावली. वैतरणा स्थानकात मोठी लोकवस्ती ही पूर्वेकडे आहे शिवाय प्लॅटफॉर्म क्र .१ वर जाण्यासाठी प्रवाशांना पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्र २ वरून १ वर जाण्यासाठी सब-वेचा वापर करून नंतर पुन्हा फूट ओव्हर ब्रिज चढून साधारण २५० मीटरचे अंतर कापावे लागते. हा खटाटोप वृद्ध प्रवाशांना खूपच गैरसोयीचा आहे. त्यामुळे बहुतांशी प्रवासी हे रेल्वेलाइन क्रॉस करतात व काही वेळा अपघाताला बळी पडतात.
वैतरणा वाढीव गावातील प्रवाशांना वैतरणा स्थानक गाठण्यासाठी पुलाचा वापर करून रेल्वे रुळांवरून चालत वैतरणा स्थानकात यावे लागते. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी वाढीव गावातील रमेश भगवान पाटील (४९) या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला इतके होऊन सुद्धा अशा दुर्दैवी घटनेची तातडीने दखल घेण्यासाठी वैतरणा स्थानकात जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नव्हते. तसेच अपघात झाल्यावर जीआरपी किंवा आरपीएफ नसल्याने काही वेळा मृतदेह अनेक तास पडून राहतात व त्यामुळे अपघाती मृतांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. १२ दिवसातील या दोन दुर्दैवी घटनांनंतर तरी रेल्वे प्रशासन वैतरणा स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल का असा प्रश्न डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सतिश गावड यांनी उपस्थित केला आहे. प्लॅटफॉर्म क्र ३ पर्यंत मर्यादित असलेला सबवे प्लॅटफॉर्म क्र १ पर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे व लोकप्रतिनिधी यांच्याकडे आम्ही केलेल्या मागणीची दखल घेऊन ती पूर्ण करावी असे ते म्हणाले.
>उघड्यावर वैतरणा स्टेशन
रेल्वे स्टेशनची दुर्दशा आणि प्रशासनाची डोळेझाक यामुळे प्रवाशांना होणारा त्रास मोठी डोकेदुखी बनत चालला आहे. रेल्वे दर वर्षी स्टेशनच्या देखभालासाठी, करोडो रु पयाचे बजेट पास करते तरी सुद्धा या एकमेव रेल्वे स्टेशनची अशी दुर्दर्शा का ? प्लॅटफॉर्मवर पत्रे का टाकत नाही ? 25 टक्के फलाटावर पत्रे आणि 75टक्के फलाटावर पत्रे का नाहीत ? असे अनेक प्रश्न येथील प्रवाशांना पडले आहेत. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने तर हा दुजाभाव होत नाही ना!

Web Title: Vetarna railway station in safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.