कबड्डी लीगच्या महासंग्रामात शिवशक्तीचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:31 AM2018-01-17T00:31:24+5:302018-01-17T00:31:31+5:30
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर आर्यन मैदानात स्व. विद्या विनोद अधिकारी क्रीडानगरीत आयोजित जिल्हा कबड्डी लीग २०१८ च्या महासंग्रामातील अंतिम
पालघर : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर आर्यन मैदानात स्व. विद्या विनोद अधिकारी क्रीडानगरीत आयोजित जिल्हा कबड्डी लीग २०१८ च्या महासंग्रामातील अंतिम सामन्यातील चुरशीच्या लढतीत शिवशक्ती वॉरियर्सने कबड्डी किंग्सचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.
जिल्ह्यात प्रथमच हे कबड्डीचे सामने मॅटवर खेळण्याचा अनुभव येथील खेळाडूंना मिळाला. तसेच राज्यस्तरावर भरविल्या जाणाºया अशा भव्यदिव्य रोषणाईच्या प्रकाशझोतातील स्टेडियमचा अनुभवही येथील क्रीडा रिसकांना या निमित्ताने पाहावयास मिळाला. कबड्डीच्या या महासंग्रामात आठ संघानी आपला सहभाग नोंदवला. उपांत्य फेरीत गवळी रायडर्सचा कबड्डी किंगने ४ गुणांनी पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली तर दुसºया उपांत्य सामन्यात शिवशक्ती वारियर्सने गवळी रायडर्सचा ७ गुणांनी पराभव करत तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले. तर सह्याद्री शिलेदार हा संघ चौथ्या क्र मांकावर राहिला. या लीगच्या अंतिम लढतीत शिवशक्ती वॉरियर्स विरुद्ध कबड्डी किंग्सच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात कबड्डी किंग्ज संघ ९-२३ असा पिछाडीवर असताना दुसºया सत्रात जोरदार कमबॅक करीत कबड्डी किंगने शिवशक्ती संघावर दमदार खेळी करत आपली आघाडी राखण्यात यश मिळविले. मात्र, शेवटच्या काही क्षणात शिवशक्तीच्या खेळाडूंनी कबड्डी किंग्जवर पुन्हा मात करण्याच्या इर्षेने जोरदार खेळ करीत चार गुणांच्या फरकाने आपल्या प्रतिस्पर्धी टीम वर मात केली. विजेत्या संघाला ३ लाख व चषक तर उपविजेत्या संघाला २ लाख व चषक पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हा कबड्डी असो.चे प्रवीण राऊत, नितीन अग्रवाल, पालघर कला-क्रीडा प्रतिष्ठानचे विनोद अधिकारी, अध्यक्ष समीर पाटील, डॉ. हेमंत सवरा, विलास पाटील, निलेश सातवी प्रमोद पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सूर्यतेज फायटर्स, गवळी रायडर्स, सह्याद्री शिलेदार, डायनामाइट, वाडा फायटर्स, शिवशक्ती वारीयर्स, कबड्डी किंग्ज यांनी सहभाग नोंदविला.