विद्यार्थी आंदोलनाचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:36 AM2017-07-29T01:36:36+5:302017-07-29T01:36:48+5:30
जिल्हा परिषदेने १२९ शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात काल विद्यार्थ्यांनी काढलेला कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, बकºया मोर्चा यशस्वी झाला असून जिल्ह्यातील या शाळा सुरूच राहणार
पालघर : जिल्हा परिषदेने १२९ शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात काल विद्यार्थ्यांनी काढलेला कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, बकºया मोर्चा यशस्वी झाला असून जिल्ह्यातील या शाळा सुरूच राहणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यामुळे विद्यार्थी तिथे शाळा ही शासनाची घोषणा कृतीत येण्यास बरीच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षणमंत्री तावडे यांनी माघार घेतली आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या सभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील आदिवासी भागातील शून्य ते तीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२९ प्राथमिक शाळा बंद करण्याचे आदेश १२ जुलै रोजी दिले होते. शिक्षण हक्क कायद्याचा व शासनाच्या आदेशाचा आधार या कारवाईसाठी घेण्यात आला असला तरी पालघर जिप व्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्ह्याने ह्याबाबत अजूनही निर्णय घेतलेला नव्हता. ह्या कारवाई च्या अंमलबजावणी पूर्वीच केंद्रप्रमुखानी अनेक चुका केल्याचे निदर्शनास आले होत्या.त्यामुळे ह्या आदेशाच्या व कारवाईच्या निषेधार्थ गुरूवारी श्रमजीवी संघटनेच्यावतीने शेकडो विद्यार्थी,त्यांचे पालक ह्यांनी ‘दप्तर घ्या आणि बकर्या द्या’ अशी मागणी करून जि. प. मुख्यालयावर मोर्च्या काढला होता. शिक्षण हक्क कायद्या नंतर गाव तेथे शाळा नव्हे तर मूल तेथे शाळा (शिक्षणाची व्यवस्था) असायला हवी असे धोरण महाराष्ट्राला अभिप्रेत असताना प्रशासन आहे त्या कशा बंद करू शकतो असा सवाल लोकप्रतिनिधींनीही उपस्थित केला होता. त्याचे उत्तर कुणाकडेच नव्हते.