Video - पालघरमध्ये एसटीला अपघात, 52 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 10:39 AM2019-08-13T10:39:42+5:302019-08-13T10:42:35+5:30

वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Video 52 passengers injured in ST accident in Palghar | Video - पालघरमध्ये एसटीला अपघात, 52 प्रवासी जखमी

Video - पालघरमध्ये एसटीला अपघात, 52 प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देवाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.एसटी प्रशासनाने 1000 रूपयांची तातडीची मदत दिली आहे.

पालघर - वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसटी प्रशासनाने 1000 रूपयांची तातडीची मदत दिली आहे. वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे  मंगळवारी (13 ऑगस्ट) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात जाऊन हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी बसमधून 52 प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत. रामनवमी प्रसाद (50) सुमन प्रसाद (45) यांच्या हात आणि पायाला फॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. 

वाडा आगाराची वाडा-पिवळी एम एच 14 बीटी 2331 या क्रमांकाची एसटी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिवळीहून वाड्याकडे येत असताना हा अपघात झाला. जांभुळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस थेट शेतात गेली. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Video 52 passengers injured in ST accident in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.