Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ; सुदैवाने जीवित हानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:26 PM2021-05-28T20:26:25+5:302021-05-28T20:27:35+5:30
Fire Case : गाडी थांबवून चालक व सहाय्यक खाली उतरेपर्यंत ट्रकचा भडका उडाला होता. त्यामुळे दूरवरून आगीचे लोळ उठल्याचे दिसून येत होते.
पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजरात वाहिनीवर खानिवडे टोलनाका सोडल्यानंतर सुमारे २०० मीटर अंतर पास करून जाणाऱ्या एका ट्रकला शुक्रवारी दुपारी 3.20 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. गाडी थांबवून चालक व सहाय्यक खाली उतरेपर्यंत ट्रकचा भडका उडाला होता. त्यामुळे दूरवरून आगीचे लोळ उठल्याचे दिसून येत होते.
महामार्ग वाहतूक पोलीस यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून चालक व सहाय्यक दोघेही सुरक्षित आहेत. मात्र ट्रकचे व त्यातील वाहतुकीच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी सदर ट्रेकला क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
आयआरबीच्या गस्त पथकाने दिलेल्या माहितीनुसार महामार्ग वाहतूक पोलिसांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. काही मिनिटांतच आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ज्वाळांनी घेरलेल्या ट्रकची आग शमवण्यास सुरुवात करून १० ते १५ मिनिटांत आगीवर ताबा मिळवला. प्लास्टिक पावडरच्या गोण्या भरून तो ट्रक गुजरात दिशेने निघाला होता, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस मनोर विभागाचे प्रभारी अधिकारी प्रकाश दिंडे यांनी दिली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजरात वाहिनीवर खानिवडे टोलनाका सोडल्यानंतर सुमारे २०० मीटर अंतर पास करून जाणाऱ्या एका ट्रकला शुक्रवारी दुपारी 3.20 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. pic.twitter.com/16grTMWKyZ
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021