मतदार यादी पुन:परीक्षण कार्यक्रमाचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:34 AM2018-10-03T05:34:51+5:302018-10-03T05:35:17+5:30

तक्रारींचा पाऊस : निमंत्रण पत्रिकाच पोहचल्या नाही, शासकीय यंत्रणा तोंडघशी

Vigilance list re-runs the program in voting | मतदार यादी पुन:परीक्षण कार्यक्रमाचा उडाला फज्जा

मतदार यादी पुन:परीक्षण कार्यक्रमाचा उडाला फज्जा

Next

वसई : मतदार यादी पुन:निरीक्षण कामासाठी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांनी बी.एल.ओ ची भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी व हे राष्ट्रीय कार्य समजावे असे परखड मत उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन यांनी निवडणूक संबधी माहिती देताना व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थितांची रोडावलेली संख्या व या मोहिमेचे व्यापक उद्दिष्ट पाहता या मोहिमेचा पुन्हा फज्जा उडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र आणि मतदार याद्यांचा पुन:निरीक्षण कार्यक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. अडीच मतदारसंघ असलेल्या वसई तालुक्यात सुद्धा हा कार्यक्र म सहकार व महसूल यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दुपारी वसईतील सोमवंशीय क्षत्रिय सभागृह येथे आयोजित केला होता. दरम्यान, पालघर जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन यांच्या निर्देशाने अवघ्या दोन दिवसाच्या कालावधीत हा महत्वाचा कार्यक्र म गडबडीत आयोजित करून वसईतील गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिव यांच्यासोबतच्या बैठकीसाठी हा राबविण्यात आला होता. मात्र, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही हा कार्यक्र म यशस्वी करू असे ठोस आश्वासन देणारे सहकार खाते आणि त्यांचे उपनिबंधक सोबत पालघर जिल्हा फेडरेशन या कार्यक्र माला उपस्थित असणारी गृहनिर्माण संथाच्या पदाधिकाºयांची संख्या पाहून चांगलेच तोंडघाशी पडले. परिणामी तासाभराने सुरु झालेल्या या महत्वपूर्ण कार्यक्र माचे मुळातच योग्य नियोजन व बहुतांशी पदाधिकाºयांना योग्य निमंत्रण न दिल्याने वसई तालुक्यातील साडेसहा हजार गृहनिर्माण संस्थांपैकी केवळ ५७ गृहनिर्माण सस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित राहिले. तसेच वसई प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी या मतदार याद्या कार्यक्र माची विस्तृत माहिती देताना मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्र मात जिल्ह्यातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रि य भाग घेऊन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे असे ही सांगितले. यावेळी मंचावर जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन, प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर, सहकारी संस्था, वसई उपनिबंधक प्रियांका गाडीलकर, नायब तहसीलदार मनीषा पिंपळे, विसपुते, ए आर, नालासोपारा अर्चना कदम , आणि जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष हार्दिक राऊत उपस्थित होते.

साड सहा हजारांपैकी ५७ संस्थांची हजेरी
या कार्यक्रमाला साडे सहा हजारापैकी केवळ ५७ संस्थेने आपली उपस्थित लावली त्यामुळे अन्य संस्थांना त्याची माहितीच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा रविवारी हा कार्यक्र म लावावा अशी मागणी करण्यात आली. तसेच अडीच मतदारसंघ असलेल्या वसई ,नालासोपारा व विरार भागातील व नवीन मतदार पाहता असे नियोजन करून विभागवार कार्यक्र म पुढील दिवसात व सुटीच्या दिवशी घेण्यात यावा अशा सूचना उपस्थितांनी केल्या.

अध्यक्ष, सचिवांना बीएलओ चे काम सक्तीचे
करून वर्ष २०१० आणि २०१२ साली मतदार यादी पुन:निरीक्षण कामासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करणे अनिवार्य असल्या बाबतचे शासन आदेशाचे परिपत्रक आहे. तसे ते या पूर्वी ही पाठवण्यात आले होते. मात्र, अनेक गृहनिर्माण संस्थांनी हे परिपत्रक वाचण्याची तसदी देखील घेतली नाही त्यामुळे सर्वत्र गोंधळ आहे.

Web Title: Vigilance list re-runs the program in voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.