विजय दुबळे जव्हार केसरी

By admin | Published: October 13, 2016 03:22 AM2016-10-13T03:22:42+5:302016-10-13T03:22:42+5:30

जव्हारचा शाही दसऱ्याचे आकर्षण बुधवारी तांबड्या मातीत पार पडलेल्या कुस्तीने द्वगुणीत केला. संस्थानकालिन राजेशाही परंपरेचा भाग असणारी कुस्ती

Vijay badali Jawhar Kesari | विजय दुबळे जव्हार केसरी

विजय दुबळे जव्हार केसरी

Next

हुसेन मेमन / जव्हार
जव्हारचा शाही दसऱ्याचे आकर्षण बुधवारी तांबड्या मातीत पार पडलेल्या कुस्तीने द्वगुणीत केला. संस्थानकालिन राजेशाही परंपरेचा भाग असणारी कुस्ती अगदी डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. यंदा दोन गोष्टी महत्वाच्या ठरल्या. पहिल्या वहिल्या ‘जव्हार केसरी’ चा मान मनमाडच्या विजय दुबळे यांनी इगतपुरीच्या गोटीराम चव्हाणला चितपट करुन मिळवला. व पहिल्यांदाच महिला कुस्तीपट्टुनी आपले डावपेच दाखवून कुस्तीप्रमींना अक्षरश: खिळवून ठेवले. पंजाबच्या हर्लिन कौरने आपल्या सरस खेळाच्या जोरावर विजय श्री पटकावली.
जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसऱ्यांची सांगता दरवर्षाच्या परंपरेनुसार कुस्त्यांच्यासामन्यांनी होत. यंदा ही जुना राजवाडा येथील प्रांगणात नगरपालिकेने कुस्त्यांच्या सामने आयेजित केले होते. परंपरेप्रमाणे दसऱ्याची सांगता या कार्यक्रमाने होत असुन बुधवारी सकाळपासुन कुस्ती खेळण्यासाठी ८३७ मल्लांनी भाग घेतला असून ५१३ कुस्त्या खेळल्या गेल्या. या चित्त थरारक सामन्यांचा हजारो कुस्तीप्रेमिंनी मनमुराद आस्वाद घेतला.
रात्रभार तारपा नृत्य व ढोलनाच करून बेभान झालेल्या आदिवासी बांधवांनी पुन्हा कुस्त्या खेळण्यासाठी व पाहण्यासाठी जुना राजवाडा येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली. बुधवारी जव्हारच्या तांबड्या मातीमध्ये झालेल्या कुस्तीसाठी नाशिक जिल्हा नगर, पुणे, तसेच सोलापूर जिल्हयातून मल्ल सहभागी झाले होते. सकाळ पासुन सुरू झालेल्या कुस्त्या सायंकाळी उशीरापर्यत सुरू होत्या.
यावेळी नगराध्यक्ष संदिप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, नगरसेवक रवी भोईर, मुख्याधिकारी वैभव विधाते, कर्मचारी अखलाक कोतवाल, शेवाळे, जगदीश मुकणे तसेच कुस्ती समेतीचे सभापती ईकााल सुलेमान कोतवाल, उपसभापती देवराज सहाणे, अशोक ताब्ंोळी, मुरलीधर जगदाळे, चिंत्रांगण घोलप, अनंता घोलप, गणेश डिंगोरे, संजय वनमाळी, अनिल आयरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Vijay badali Jawhar Kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.