वनगा यांचा ५ लाखाहून अधिक मते मिळविण्याचा विक्रम यावेळी मोडणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:00 AM2019-04-26T00:00:06+5:302019-04-26T00:00:30+5:30
पालघर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांनी मिळविलेल्या ५,३३,२०१ मते मिळविण्याचा विक्रम यावेळी तुटणार काय? ...
पालघर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांनी मिळविलेल्या ५,३३,२०१ मते मिळविण्याचा विक्रम यावेळी तुटणार काय? अशी चर्चा जिल्हयात सुरू आहे.
या निवडणुकीत ते ५३.७२ मते मिळवून २३९५२१ च्या मताधिक्याने विजयी झाले होते. ही मताधिक्याची टक्केवारी २९.५९ एवढी होती. यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी होते बविआचे बळीराम जाधव त्यांना २,९३,६८१ मते पडली होती. विशेष म्हणजे ६२.९० इतके मतदान झाले असतांना त्यापैकी ५३७२ टक्के मते मिळवून वनगा यांनी हे मताधिक्य मिळाले होते. विशेष म्हणजे जाधव वगळता अन्य सर्व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले होते. जाधव यांना जेवढी मते पडली त्यांच्या खालोखाल मताधिक्य वनगा यांनी मिळविले होते. इतक्या प्रचंड संख्येने कुठल्याच उमेदवाराला मते मिळविता आलेली नाहीत. या क्षेत्रातले जाणकारही एवढी मते पुन्हा मिळविणे अवघड असल्याचे सांगातात.२०१४ मध्ये मोदी लाट होती. त्यामुळे त्यांना हे मताधिक्य मिळाले असे सांगितले जाते. वनगा यांचे निधनानंतर त्याचे पुत्र श्रिनिवास हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून पोटनिवडणुकीला उभे राहिले. त्यांना २४३२१० एवढी मते पडली. यावेळी सेना भाजपची युती नव्हती भाजपने काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना दत्तक घेतले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून २७२७८२ मते मिळवून ही निवडणुक जिंकली होती. गावित आणि वनगा या दोघांना मिळालेली मते युतीची मते म्हणून जरी एकत्र केली तरी ती ५ लाखाच्या असपास जाते आणि ती मते वनगांनी २०१४ च्या निवडणुकीत मिळविलेली मतांपेक्षा कमीच भरतात.