सीओंसाठी विक्रमगडला उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:09 AM2017-07-18T02:09:20+5:302017-07-18T02:09:20+5:30

जानेवारीपासून सुरु झालेलेल्या विक्रमगडच्या नगरपंचायतीला गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकारी न लाभल्याने तो तातडीने नेमला जावा यासाठी नगराध्य

Vikramgadah fasting for the villages | सीओंसाठी विक्रमगडला उपोषण

सीओंसाठी विक्रमगडला उपोषण

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : जानेवारीपासून सुरु झालेलेल्या विक्रमगडच्या नगरपंचायतीला गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकारी न लाभल्याने तो तातडीने नेमला जावा यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक मंगळवारपासून उपोषणाला बसणार आहेत. आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री विष्णू सवरा यांचा हा मतदारसंघ असल्याने तिथल्याच नगरपंचायतीचा गेले ५ महिने बोजवारा उडाला तरी ते धृतराष्ट्र का झाले आहेत, असा प्रश्न सगळ्या जिल्ह्याला पडला आहे.
सवरा हे अत्यंत स्वार्थी राजकारणी आहेत. वाडा पंचायततील भाजपची सत्ता टिकावी आणि मतदारांनी शिवसेनेचे शांताराम मोरे यांना विजयी केल्याची शिक्षा मतदारांना मिळावी यासाठी त्यांनी वाडा ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊ दिली नाही.तर विक्रमगड येथील नगरपंचायतीत निलेश सांबरे प्रणीत आघाडीची सत्ता आल्याने व भाजपाचा दारूण पराभव झाल्याने त्यांनी या पंचायतीला मुख्याधिकारीच लाभू दिलेला नाही. त्यात ससेहोलपट नागरिकांची होते आहे. विकास कामे सोडा दैनंदिन कारभारही करता येणे शक्य झालेले नाही. विष्णू सवरा यांचा हा मतदार संघ असल्याने त्यांचेकडे लेखी निवेदने सादर केली आहेत़ मात्र त्याची काडीमात्र दखल घेतली जात नसल्याने तसेच विक्रमगड बाजरपेठेमध्ये गटारिंच्या व रस्त्यांच्या दुतर्फा दुकाना समोर भाजीवाले,फळविक्रेते,व अन्य दुकानदारांनी आपली दुकाने थाटुन अतिक्रमण केलेले आहे़ टप-या टाकलेल्या आहेत त्यामुळे अतिक्रमण हटविणे बाबत आणि मोठी पाणी पुरवठा योजना मंजुर करणे या मागण्या घेवुन आज तहसिलदार कार्यालयासमोर उपोषणास बसून न्या मागणार आहेत़ ़विक्रमगडच्या मुख्य बाजारपेठेमधील गटारीवर गटारीच्या बाहेर टप-या टाकून व्यवसाय करणारे,भाजी, फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने मोठयाप्रमाणावर ट्रॅफीक जॅम होते,त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तर गेल्या अनेक वर्षापासून नव्या फिल्टर योजनेचा प्रस्ताव धूळखात पडलेला आहे़ त्यामुळे आजही येथील ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने े आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या विरोधात नगरपंचायत एकवटली आहे.

अशी आहे अवस्था
नवनिर्मित विक्रमगड नगरपंचायतीचा कार्यभार जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आहे़ मात्र ते ही येथे एखादी दुसरी फेरी मारुन कारभार करीत असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होते आहे.

मंत्री सवरा नॉट रिचेबल
सवरा यांच्याशी संपूर्ण दिवसभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला नाही. ते राष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

ही तर मतदारांना शिक्षा
या नगरपंचायतीत शहरवासीयांनी विरोधकांना सत्ता प्रदान केली. त्याची शिक्षा पालकमंत्री आपलाच मतदारसंघ असलेल्या शहरातील जनतेला जाणूनबुजून देत आहेत काय- निलेश सांबरे

चार महिने दुर्लक्ष
आम्ही मुख्याधिकारी नेमण्यासाठी मंत्री सवरा यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत़ मात्र त्याकडे दुर्लक्ष केले
-रविंद्र खुताडे, नगरध्यक्ष, विक्रमगड

Web Title: Vikramgadah fasting for the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.