विक्रमगडमध्ये एक गाव एक होळी; आज होणार चोरटी होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:05 AM2019-03-19T04:05:10+5:302019-03-19T04:05:25+5:30

विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात आजही ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण खेडया-पाडयात, शिळ, आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, ओंदे, दादडे या भागात आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्याची पंरपरा आहे.

 A village is a Holi in Vikramgad; Today will be the Biggest Holi Holi | विक्रमगडमध्ये एक गाव एक होळी; आज होणार चोरटी होळी

विक्रमगडमध्ये एक गाव एक होळी; आज होणार चोरटी होळी

googlenewsNext

- राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यातील अनेक गावात आजही ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण खेडया-पाडयात, शिळ, आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, ओंदे, दादडे या भागात आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्याची पंरपरा आहे. याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत प्रत्येक सोसायटी, नगरात छोटया मोठया होळया पेटवुन नंतर धुळवडीचे रंग उधळले जातात. मात्र ग्रामीण भागात आधुनिक युगाामध्येही एक गाव एक होळी अशी परंपरा आजही सुरु आहे़
पहिले तिन दिवस छोटया होळया व मंगळवारी मुख्य होळी पेटण्याच्या आदल्या दिवशीम्हणजेच चौथा दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच २० मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो़
या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमगा आल्याची ग्वाही देत आहे़
चोरटी होळीसाठी तरुण गावातुनच लाकडे चोरुन आणतात़ पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते. या होळीची पारंपारिक पध्दतीने पुजा केली जाते़ गावातील नवविवाहीत जोडपी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पध्दत आहे. त्यानंतर होळी पेटविली जाते़
होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी सर्वाचिच झुंबड उडत असते़ साखरेच्या पाकापासुन तयार केलेले गाठीहार लहान मुले होळीच्या दिवशी गळयात घालून मिरवतात. दरवर्शी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेला होळीची माळ असे म्हणतात़ याच माळावर पाच दिवस विविधखेळ, गरबानृत्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम, तर ग्रामीण खेडया पाडयावर तारपा नृत्य, ढोलनाच, लेझीम ंव सामुहिक गरबानृत्य असे विविध कार्यक्रम रात्रभर खेळले जातात़
होळीच्या दुसºया दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळया केल्या जातात़ धुलीवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते तर, रंगपंचमीला गावाकडे झाडा-फुलांपासुन तयार केलेले नैसर्गीक रंगाचा आवर्जुन वापर केला जातो़ सध्या बाजार पेठेमध्ये अनेक रंग मिळत असले तरी ग्राहक नैसर्गिक रंगाची मागणी करीन आहेत.

पूजेची आगळी परंपरा अन् कोंबडीचे पिलू

होळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी) अगर बांबुच्या फांदया होळीमाता म्हणुन आणुन त्याची पुजा केली जाते. पुजेला तांदळाच्या नागलीच्या व कुरडई पापडया, पुरणपोळी घरी बनवलेल्या वस्तुंचा नैवैद्य दाखविला जातो़

बांबु किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेड्यावर अगर रितीप्रमाणे जिवंत कोंबडीचे पिल्लु बांधले जाते ही प्रथा आजही आबाधीत आहे. त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेले आपल्या पत्नीला खांदयावर उचलून होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा असून त्याची आजही अंमलबजावणी होत आहे़

Web Title:  A village is a Holi in Vikramgad; Today will be the Biggest Holi Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.