गावितांनी आघाडी कायम ठेवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:58 PM2018-05-31T23:58:08+5:302018-05-31T23:58:08+5:30
भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकी.....
हितेन नाईक
पालघर : भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यानी शिवसेनेचे श्रीनिवासन वनगा याचा २९ हजार ५७२ मतानी दणदणीत पराभव केला. ह्या निवडणुकीत सेनेला वनगांच्या मृत्यूच्या सहानुभूतीचा लाटेचा फायदा मिळेल ही अपेक्षा मतदारांनी फोल ठरविली.
संपूर्ण देशभर गाजलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, माकप, शिवसेना, बविआ व दोन अपक्ष असे सातजण रिंगणात होते. निवडणूक प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला टाकून सेनेने चितामण वनगाच्या कुटुंबियांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याचे व सेनेने भाजपाचा कार्यकर्ता तर भाजपाने काँग्रेसचा कार्यकर्ता पळविल्याचा मुद्दा चर्चेत येत होता.
पालघरच्या शासकीय गोदामात गुरु वारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. एकुण ३३ फेर्या मध्ये मतमोजणी करण्यात येणार असल्याने निकाल एकण्यासाठी जिल्ह्यातील नागरीक उत्सुक होते. मात्र यावेळी सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल ह्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु पहिल्या फेरीतच भाजप ने आघाडी घेतल्याने मतमोजणी ठिकाणा पासून सेना कार्यकर्त्यांनी दूर राहणेच पसंद केले.
मतमोजणीच्या पिहल्या फेरीतच भाजपाचे राजेंद्र गावीत यानी बविआचे बळीराम जाधव यांच्यावर १४६ मताची आघाडी घेतली ती सलग पाचव्या फेरी पर्यत वाढत जात १६ हजार ४५० मतांची आघाडी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यावर घेतली. तर सेना ४२ हजार ५७६ मत पडून तिसऱ्या क्र मांकावर राहिली.
सहाव्या फेरीत दुसºया क्र मांकावर असलेल्या बवीआच्या उमेदवाराला (४७ हजार ६०६) मागे टाकीत सेनेचे श्रीनिवास (५२ हजार ८९३ मते) हे दुसºया क्र मांकावर पोचले. मात्र तोपर्यत राजेंद्र गावीत यानी एकुण ६७ हजार ९७५ मते मिळवीत सेनेवर 15 हजार ०८२ मताची आघाडी घेण्यात यश मिळविले. गवितांनी पिहल्या फेºया पासून घेतलेली आघाडी शेवटच्या ३३ व्या फेरी पर्यंत वाढवीत नेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढुच दिले नाही.
मतमोजणीच्या अंतिम ३३ व्या फेरीत ईवीएम मधील नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील १८८ मता पैकी सर्वाधिक ८१ मते घेऊन तेथील सत्ताधारी बविआला जोरदार धक्का दिला असून तेथे काँग्रेसला ३ मते व सेनेला २५ मते आणि बविआला ७९ मते मिळवीत समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत माकप ने आपली पारंपरिक मत राखण्यात यश मिळविले असून ७१ हजार ८८७ मते मिळविण्यात यश मिळविले. काँग्रेसचे ५ वेळा निवडून आलेले माजी खासदार दामु शिगंडा याना पन्नास हजार मताचा आकडाही पार करता आला नसल्याने काँग्रेस पदाधिकाºयांची जिल्ह्यातील आपली ताकद समोर आल्याचे पहावयास मिळाले.