झाडे तोडण्यास ग्रामस्थांचा विरोध; जलवाहिन्या टाकण्याचे काम थांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 12:44 AM2020-02-07T00:44:34+5:302020-02-07T00:45:02+5:30

वन अधिकाऱ्यांना हुसकावले

Villagers protest against cutting down trees; Drainage stopped | झाडे तोडण्यास ग्रामस्थांचा विरोध; जलवाहिन्या टाकण्याचे काम थांबले

झाडे तोडण्यास ग्रामस्थांचा विरोध; जलवाहिन्या टाकण्याचे काम थांबले

Next

कासा : वसई -विरार, मीरा - भाईंदर महापालिकेसाठी सूर्या प्रकल्पातील धामणी, कवडास धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी एमएमआरडीए पाणीपुरवठा योजना राबवित आहे. यायासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, वनपट्ट्यातून जाणाºया जलवाहिन्यांसाठी झाडे तोडण्यासाठी वेती ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला आहे. त्यामुळे प्रस्तावित जागेवर पोलीस बंदोबस्तात झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीए आणि वन अधिकारी गेले असता ग्रामस्थांच्या विरोधापुढे त्यांना माघार घ्यावी लागली.

४०३ दशलक्ष ली. प्रतिदिन पाणीपुरवठा योजना मीरा - भार्इंदर तसेच वसई - विरार आणि परिसरासाठी राबविली जात आहे. पण या योजनेसाठी वेती तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वनहक्क समितीच्या माध्यमातून आंदोलन करून, मोर्चा काढून त्यास प्रखर विरोध दर्शविल्याने हे काम रखडले आहे. एमएमआरडीए प्रकल्पाला ग्रामपंचायत, वनहक्क समिती तसेच सूर्या पाणी बचाव समितीचाही विरोध आहे.

वेती गावातील वनपट्ट्यांतील प्रस्तावित जागेतून ही जलवाहिनी जात असल्याने तेथील झाडे तोडण्याच्या कामासाठी, होणारा विरोध लक्षात घेत पोलीस बंदोबस्तात वनविभागाचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी झाडे तोडणार होते. परंतु, वेती येथील ग्रामस्थांनी झाडांना विळखा घातल्याने आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. डहाणूतील पर्यावरण संरक्षण समितीची परवानगी नसल्याने हा प्रकल्प राबवू दिला जाणार नाही असे वनहक्क समितीचे म्हणणे आहे.

आम्ही मागच्या महिन्यात कासा पोलीस ठाण्यात या पाणी पुरवठा योजनेला, आणि वनपट्ट्यात फेरफार केलेल्या अधिकाºयांविरोधात तक्रारी केल्या आहेत. पण कोणतीही कारवाई झाली नाही, आमचा या प्रकल्पाला विरोध राहील.
- प्रकाश हाडळ, वनहक्क समिती अध्यक्ष, वेती

वन अधिकाऱ्यांनी या झाडे तोडण्याच्या कामासाठी बंदोबस्त मागितला होता. तो आम्ही दिला पण ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे अधिकाऱ्यांना परत जावे लागले.
- आनंदराव काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कासा

Web Title: Villagers protest against cutting down trees; Drainage stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.