ग्रामस्थांनी सोडविला पाणीप्रश्न, इतरांसाठी निर्माण केला आगळावेगळा आादर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:22 AM2018-05-16T03:22:30+5:302018-05-16T03:22:30+5:30

विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे.

The villagers resolved the water dispute, created a unique demonstration for others | ग्रामस्थांनी सोडविला पाणीप्रश्न, इतरांसाठी निर्माण केला आगळावेगळा आादर्श

ग्रामस्थांनी सोडविला पाणीप्रश्न, इतरांसाठी निर्माण केला आगळावेगळा आादर्श

- राहुल वाडेकर 
तलवाडा : विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाकडून या पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची उपययोजना करण्या ऐवजी टँकरने पाणीपुरवठा करून तात्पुरती मलम पट्टी केली जात आहे. तालुक्यातील खुडेद म्हसेपाडाची लोकसंख्या २०० ते ३०० च्या दरम्यान आहे. येथे एकच बोअरवेल आहे या बोअरवेल वरुनच म्हसेपाडा, घोडीचापाडा या दोन पाड्यातील नागरीकाना पाणी भरावे लागत असल्याने या पाडयांना दरवर्षी एप्रिल, मे, जून ह्या महिन्यांमध्ये पाणी टंचाईचा फटका बसत असतो. शासनाकडून या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येऊन सावली चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबईच्या मदतीने श्रमदानातून जुन्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ काढून ती पुनर्जीवित केली व पाड्यातील पाणी टंचाईवर कायम स्वरु पात मात केली आहे.
गावाने ठरवले तर पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची मात कशी होऊ शकते याचा व गाव करील ते राव काय करील? या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
या गाव शिवारात कुठलेही धरण, तलाव किवा बंधारा नाही. हा भाग डोंगर-दºयांत वसलेला आहे. यामुळे या भागाला दर वर्षी पाणी टंचाईचा फटका बसत असतो. पाणी टंचाई सुरु झाली की पायपीट करत महिलाना पाणी भरावे लागत होते या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी पाड्यातील नागरिकांनी एकत्र येऊन पाड्यात एकमेव असलेली आणि गाळाने खचाखच भरलेल्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ ८ ते १० दिवसांच्या श्रमदानाने काढला.त्याना साथ दिली ती मुंबई येथील सावली चेरीटेबल ट्रस्टने.
आमचा पाड्याला दरवर्षी पाणी टंचाई जाणवत होती. त्यामुळे मे महिन्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. असे असातांना आम्हला सावली चेरीटेबल ट्रस्ट, मुंबई याच्या सहकार्याने विहिरीतील गाळ काढण्यास मदत झाली. त्यामुळे पाड्याचा पाणी टंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. -पिंटी सुभाष गांगोडा, महिला, खुडेद पैकी म्हसेपाडा
आमचा पाडा उंच भागात आहे. त्यामुळे पाणी टंचाई आहे. गावात एकमेव बोअरवेल असून ती वरूनच घोडिचापाडा व म्हसेपाडा या दोन पाड्यातील महिला पाणी भरतात. त्यामुळे पाणी टंचाई जाणवत होती. त्यातच एकमेव विहिरीत गाळ साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाळ काढल्याने पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटला आहे. -लहू नडगे, ग्रामस्थ, खुडेद
>गावकरीही सोडवू शकतात प्रश्न
या दोन पाडयातीत पाणी टंचाईमुळे होणारी महिलाची पायपीट कायम स्वरूपाची थांबणार असून या पाड्याने श्रमदानातून कायम स्वरूपाची पाणी टंचाईवर मात केली आहे.त्यामुळे ग्रामस्थांमधे आनंदाचे वातावरण आहे . यापुढे गावात पाणीटंचाई दूर होणार असून ग्रामस्थ व गुरेढोरे यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम सुटल्याने ग्रमस्थानी समाधान व्यक्त केले.आपल्या गावपाड्याचा प्रत्येक प्रश्न शासनानेच सोडवावा असे नाही.त्यासाठी आपणही पुढाकार घेऊन विधायक काम करू शकतो, याचा उत्तम आदर्श या गावाने इतरांसाठी निर्माण केला आहे.

Web Title: The villagers resolved the water dispute, created a unique demonstration for others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.